गणेश चतुर्थीला आकाशात चंद्र आणि शुक्राची युती, विलोभनीय दृश्य पाहून नागरिक अचंबित
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज आकाशात अनोखी युती दिसली. चंद्रकोरीच्या बाजूला शुक्र ग्रह दिसल्याने त्यांची युती पाहून नागरिक हरखले...

गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र असताना गणेश चतुर्थीच्या दिवशीत सोमवारी सायंकाळी आकाशात चंद्र आणि शुक्राची यु्ती झाल्याचे मनोहारी दुश्य लोकांना पाहायला मिळाले.
गणेश चतुर्थीला चंद्रकोरी समोर चमकणाऱ्या तेजसवी शुक्र ग्रहाचे आज दर्शन झाले. या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत या घटनेला चंद्र-शुक्र युती असे म्हटले जाते.
प्रत्यक्षात चंद्र आणि शुक्र ग्रह यांच्यात प्रचंड अंतर असून, पृथ्वीवरून पाहताना ते जवळ असल्याचे भासते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकाशातील या नयनरम्य दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधले आणि मोबाईलने अनेकांनी याचे फोटो आणि व्हिडीओ स्टेटसला ठेवले होते.
आकाशात चंद्रकोर आणि बाजूला शुक्र ग्रह दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला होता.
नागरिकांनी हे विलोभनीय दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य चित्रित करण्यासाठी आणि हे विलोभनीय दृश्य पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.