Gold Price Dropped : सोनं धाडकन 1 लाखांपर्यंत कोसळणार का? सराफा बाजारात लवकरच मोठी खळबळ? तज्ज्ञांचा अंदाज आला!
चांदीचा भावही एकाच दिवशी तब्बल 8400 रुपयांनी घसरला. या घसरणीनंतर सोन्याचा भाव 1.70 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. याच कारणामुळे भविष्यात सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो का, असे विचारले जात आहे.

Gold Rate Dropped : सध्या सोिने आणि चांदीच्या भावात कधी वाढ होतेय तर कधी घसरण होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी एका दिवसात वायदा बाजारात सोनं 2100 रुपयांपेक्षा कमी झाल्याचं पाहायला मिळाल. या घसरणीनंतर सोन्याचा भाव थेट 1.35 रुपयांपर्यंत कमी झाला.
चांदीचा भावही एकाच दिवशी तब्बल 8400 रुपयांनी घसरला. या घसरणीनंतर सोन्याचा भाव 1.70 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. याच कारणामुळे भविष्यात सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो का, असे विचारले जात आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भविष्यात सोन्याचा भाव 1.15 ते 1.25 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरू शकतो. परंतु सोन्याचा भाव एक लाख रुपयांपर्यंत घसरू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
कारण सोन्याच्या भावामध्ये भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण शक्य नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. चांदीच्या भावाबाबत सांगायचे झाल्यास भविष्यात हा भाव 1.40 लाख ते 1.60 लाख रुपये प्रति किलोपर्यंत कमी होऊ शकतो.
दरम्यान, सोन्याचा भाव कधी वाढतो तर कधी कमी होतो. त्यामुळे भविष्यात सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.