
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ करिअरच्या बाबतीत सध्या कठीण काळातून जात आहे. भारतीय संघाचा भाग असताना त्याने आपला तुफान खेळ दाखवलेला आहे. आता मात्र तो त्याच्या करिअरमध्ये कठीण काळातून जात आहे.

पृथ्वी शॉने 2025 सालाच्या आयपीएलच्या लिलावात भाग घेतला होता. त्याने या लिलावात त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये ठेवली होती. मात्र त्याला कोणत्याही संघाने करारबद्ध केले नाही. तो अनसोल्ड राहिला. तो सध्या भारतीय क्रिकेट संघाचाही भाग नाही.

करिअरच्या बाबतीत पृथ्वी शॉ सध्या गटांगळ्या खातोय. पण त्याची लव्ह लाईफच्या बाबतीत मात्र तो एकदम आनंदी असल्याचं म्हटलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या आयुष्यात आता नवी मुलगी आली आहे.

विशेष म्हणजे या मुलीचं वय अवघं 22 वर्षे असून पृथ्वी शॉने आजच (2 मे) तिचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला आहे. पृथ्वी शॉच्या या कथित गर्लफ्रेंडचं नाव आकृती अग्रवाल असे आहे.

नुकतेच पृथ्वी शॉचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसत होती. ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कोणी नसून आकृती अग्रवाल होती.

सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघेही एकमेकांना सध्या डेट करत आहेत. आज आकृतीचा बर्थडे आहे.

हे निमित्त साधून पृथ्वी शॉने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर आकृती अग्रवालसोबतचा एक फोटो शेअर केला असून आकृतीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

आकृतीचा जन्म 2 मे 2003 रोजी लखनौ शहरात झाला. सध्या ती मुंबईत राहते. इन्स्टाग्रामवर तिला लाखो लोक फॉलो करतात. आकृचतीचे एक यूट्यूब चॅनेलही आहे.

आकृती अग्रवाल त्रिमुखा या चित्रपटात दिसणार असून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.