CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं

कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी 'आणखी मारा..' असं म्हणत तरुणांनी आक्रोश केला. या आंदोलनाची काही दृश्ये फोटोंच्या माध्यमातून पहा..

| Updated on: Jul 20, 2026 | 3:52 PM
1 / 10
नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

2 / 10

या आंदोलनामुळे संसद भवन परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या.

3 / 10

यात असंख्य आंदोलन जखमी झाले. 'इन्कलाब जिंदाबाद'च्या घोषणा देत मोठ्य संख्येने आंदोलकांनी राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश केला.

4 / 10

आजच्या आंदोलनासाठी लोक रविवारी रात्री 11 वाजल्यापासूनच जंतर मंतर इथं जमू लागले होते. अनेकांनी फूटपाथवर झोपून रात्र काढली. सकाळी मोर्चा सुरू झाल्यावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

5 / 10

संसद भवनावरील धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक सकाळी 8 वाजता जंतर मंतर इथं जमले. आंदोलकांनी जंतर मंतरपासून संसदेच्या दिशेनं मोर्चा काढला. त्याठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष उफाळून आला.

6 / 10

या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर काही आंदोलक आणखी आक्रमक झाले. "मला मारा, मला मारा" अशा घोषणा एक आंदोलक देत होता. सुरक्षा दलांनी आंदोलकांना रोखण्यासाठी संसद भवनाबाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या.

7 / 10

पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना बसमधून नेण्यात आलं.

8 / 10

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोक रविवारी रात्री उशिरापर्यंत जंतर मंतरवर पोहोचले होते. दिल्ली पोलीस आणि आरएएफने जंतर मंतर इथं येणाऱ्या लोकांची तपासणी केली.

9 / 10

जंतर मंतर इथं रात्रभर चाललेल्या आंदोलनात सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंगमोदेखील उपस्थित होत्या.

10 / 10

काही आंदोलक गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतर इथं आहेत. रविवारी रात्री त्यांच्यापैकी अनेक जण रस्त्यावर झोपलेले दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us