या गाण्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही, 14 वर्ष जुन्या या गाण्याची क्रेझच काही वेगळी

गणेश चतुर्थीच्या उत्सवात बाप्पाच्या गाण्यांना विशेष महत्त्व असतं. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात अनेक लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतात. यामध्ये एका महत्त्वाच्या गाण्याचा हमखास समावेश केला जातो. हे गाणं अनेकांचं आवडतं असतं. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाणं आजही गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने वाजवलं जातं.

| Updated on: Sep 13, 2026 | 4:36 PM
1 / 5
‘देवा श्री गणेशा’ हे गाणं ‘अग्निपथ’ चित्रपटातील आहे. या गाण्यात ऋतिक रोशनसोबत प्रियंका चोप्रा दिसली होती. गाण्याच्या चित्रीकरणात 50 ते 100 डान्सर्सनी सहभाग घेतला होता. त्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली होती.

‘देवा श्री गणेशा’ हे गाणं ‘अग्निपथ’ चित्रपटातील आहे. या गाण्यात ऋतिक रोशनसोबत प्रियंका चोप्रा दिसली होती. गाण्याच्या चित्रीकरणात 50 ते 100 डान्सर्सनी सहभाग घेतला होता. त्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली होती.

2 / 5

या गाण्याच्या निर्मितीत लाइव्ह वाद्यसंगीताचा वापर करण्यात आला होता. अजय गोगावाले यांनी गाण्याला आवाज दिला आहे. भक्तिमय संगीत आणि दमदार सादरीकरणामुळे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं.

3 / 5

‘देवा श्री गणेशा’ या गाण्याला यूट्यूबवर 180 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गणेश चतुर्थीच्या काळात हे गाणं आजही मोठ्या प्रमाणावर ऐकलं जातं. सोशल मीडियावरही त्याची लोकप्रियता पाहायला मिळते.

4 / 5

2012 मध्ये आलेल्या ‘अग्निपथ’मध्ये ऋतिक रोशनने विजय दीनानाथ चौहानची भूमिका साकारली होती. संजय दत्त कांचा चीना या भूमिकेत दिसला, तर प्रियंका चोप्राही महत्त्वाच्या भूमिकेत होती. हा चित्रपट 1990 मध्ये आलेल्या ‘अग्निपथ’चा रिमेक होता.

5 / 5

‘देवा श्री गणेशा’ व्यतिरिक्त ‘अग्निपथ’मध्ये ‘चिकनी चमेली’, ‘शाह का रुतबा’, ‘ओ सईयां’, ‘अभी मुझ में कहीं’ आणि ‘गुन गुना’ ही गाणी आहेत. या सर्व गाण्यांनी चित्रपटाच्या संगीताला वेगळी ओळख मिळवून दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us