Diwali Home Cleaning Tips : ऑफिसमुळे घरात दिवाळीची साफसफाई करायला वेळ मिळत नाही? काळजी नको, यामुळे साफसफाई होईल एका झटक्यात

ऑफिस आणि घरकाम सांभाळताना दिवाळीच्या साफसफाईसाठी वेळ काढणं कठीण होतं? मग घर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणारी ही ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील उपयोगी.

| Updated on: Oct 14, 2026 | 8:54 PM
1 / 6
दिवाळी यायच्या आधी घरात साफसफाईचे काम सुरू होतं. पण बऱ्याच महिला ऑफिसला जात असल्याने घरात साफसफाई करायला त्यांना वेळचं मिळतं नाही. कामवाल्या बाईला सांगायचं झालं तर ती याचे एक्स्ट्रा पैसे घेणार. त्यापेक्षा हे काही गॅझेट्स खरेदी केलेले उत्तम. एकदाच खर्चही होईल आणि जेव्हा हवा जसा हवा तसं वापरताही येईल.

2 / 6

रोबोट व्हॅक्युम क्लीनर : हा एक स्मार्ट रोबोट आहे. जो घरात जमिनीवरील धूळ, माती ऑटोमॅटिक पद्धतीने साफ करतो. यात मॉपिंग आणि स्वीपींग म्हणजेच झाडणे आणि पुसणे या दोन्ही सुविधा असतात. बस एक बटन दाबलं आणि काम झालं.

3 / 6

टेलिस्कोपिक फॅन डस्टर : लांब दांडा असलेल्या या डस्टमुळे शिडीचा आधार न घेता थेट छतावरील पंख्याच्या पात्यापर्यंत पोहोचून धूळ सहज साफ करता येते

4 / 6

मायक्रोफायबर फॅन क्लीनर आणि ब्रश : पंख्याच्या पात्यांना दोन्ही बाजूंनी पकडून त्यावरची धूळ ओढून घेणारा हा ब्रश धूळ हवेत न उडवता साफ सफाई करण्यास मदत करतो.

5 / 6

एअर प्युरीफायर : दिवाळीत फटाक्यांचा धूर घरभर पसरतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. एअर प्युरिफायर हवा शुद्ध करण्याचे काम करतो .

6 / 6

स्पिन मॉप : हाताचा स्पर्श न करता लादी पुसण्यासाठी, लादीवरील डाग काढण्यासाठी हे गॅझेट फायद्याचे ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us