AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: सगळ्यांच्याच खात्यात येणार 3.4 लाख? कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार, त्या अहवालात काय?

8th Pay Commission JP Morgan Report: 8 व्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेतील 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लॉटरी लागणार आहे. जेपी मॉर्गनच्या एका अहवालानुसार शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 3.4 लाख रुपये येतील.

8th Pay Commission: सगळ्यांच्याच खात्यात येणार 3.4 लाख? कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार, त्या अहवालात काय?
8 व्या वेतन आयोग, सगळ्यांच्याच खात्यात येणार 3.4 लाख?
| Updated on: Nov 28, 2026 | 8:09 AM
Share

8th Pay Commission JP Morgan Report: सध्या देशातील 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 8 व्या वेतन आयोगाची प्रतिक्षा लागली आहे. त्याचवेळी जेपी मॉर्गन या ब्रोकरेज फर्मने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. दोन दिवसांपूर्वी फर्मने हा अहवाल सादर केला आहे. इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी आऊटलूक फॉर 2027 या नावाने हा अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यातील दाव्यानुसार, नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला साधारणपणे 3.4 लाख रुपयांची थकबाकी आणि दरमहा 15,400 रूपयांची वाढ मिळू शकते. अर्थात हा एका ब्रोकरेज फर्मचा अहवाला आहे. त्यातील अंदाज आहे. अंतिम निर्णय शासनाच्या धोरणावर अवलंबून असेल.

3.4 लाख रुपयांमागील गणित काय?

JP Morgan च्या तज्ज्ञांनुसार, नवीन वेतनचक्र (Pay Cycle) जानेवारी 2026 पासून प्रभावी मानले जाईल. सुधारित वेतन ऑक्टोबर 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जानेवारी 2026 ते ऑक्टोबर 2027 या कालावधीतील 22 महिन्यांची थकबाकी मिळेल. सरासरी 15,400 रूपयांची मासिक दरवाढ लक्षात घेता ही रक्कम 3.4 लाख रुपये इतकी होईल. एकूण लाभार्थ्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम 4 लाख कोटी रुपये इतकी होण्याचा अंदाज आहे.

सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार

अहवालातील अंदाजानुसार, सध्याचा महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन झाल्यानंतर आणि 1.83 असा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर वेतन आणि पेन्शनमध्ये 14 टक्के प्रत्यक्ष वाढ होऊ शकते. सरकारच्या संभाव्य 7.2 लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे 1.2 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये विभाजन केल्यानंतर सरासरी 15,400 रूपयांची मासिक दरवाढ समोर येते. आर्थिक वर्ष 2027-28 आणि आर्थिक वर्ष 2028-2029 या दोन वर्षात सरकारी तिजोरीवर 7.2 लाख कोटींचा अतिरिक्त भार पडू शकतो. ज्यामध्ये 3.2 लाख कोटी रुपये नियमित वाढीव वेतनासाठी आणि 4 लाख कोटी रुपये थकबाकी अदा करण्यासाठी सरकारला द्यावे लागण्याचा अंदाज सदर अहवालात वर्तवण्यात आला आहे. थकबाकीची रक्कम सरकार दोन आर्थिक वर्षात विभागून देण्यात येईल. पहिल्या आर्थिक वर्षात 40 टक्के तर दुसऱ्या आर्थिक वर्षात 60 टक्के थकित रक्कम अदा करण्यात येईल.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?