AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope: आज या राशींवर असणार शनीची वक्रदृष्टी, वाचा 12 राशींचे भविष्य

Todays 28 November 2026 Horoscope: आजचा दिवस हा 12 राशींसाठी कसा असणार? तुमची रास काय सांगते? वाचा एका क्लिकवर राशीभविष्य...

Todays Horoscope: आज या राशींवर असणार शनीची वक्रदृष्टी, वाचा 12 राशींचे भविष्य
Todays HoroscopeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 7:54 AM
Share

आज शनिवार, शनी देवाचा दिवस आहे. अनेकजण शनी देवाची पूजा करून चुकीच्या गोष्टींसाठी माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आज 28 नोव्हेंबर 2026 रोजीचा दिवस वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कसा असणार? कोणत्या राशीला फायदा होणार आणि कोणत्या राशीला तोटा होणार असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य…

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीसाठी सामान्य राहील. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रेमसंबंधात अहंकार सोडून द्या. कोणताही नवीन निर्णय घेताना घाई करू नका आणि सावधगिरी बाळगा. घराच्या आसपास गाय दिसल्यास दान करायला विसरू नका. लवकरच तुमच्यासाठी चांगली बातमी येणार आहे.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायात वाढ आणि विस्तार दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना लवकरच नवीन प्रोजेक्ट मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील, पण तुमच्या कलागुणांना चांगली संधी मिळेल.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस खास राहणार आहे. जुन्या मित्राशी भेट होऊन आठवणींना उजाळा मिळेल. व्यवसायात एखादा महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे. संपत्तीचे नवे मार्ग सापडू शकतात. मुलांसाठी दिवस अनुकूल आहे आणि महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीसाठी आज प्रगतीचा दिवस आहे. घरातील ज्येष्ठांचा पाठिंबा असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखमय राहील. संध्याकाळी पार्टनरला छान भेटवस्तू देण्याची संधी येईल आणि आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास ठरेल. व्यवसायात दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामासाठी जास्त प्रवास करावा लागू शकतो, ज्या दरम्यान अनेक लोकांशी भेटी होतील. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला राहील. दीर्घकाळ रखडलेले काम वेळेत पूर्ण होईल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल आणि समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. प्रगतीचे अनेक संकेत दिसतील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. ना विशेष लाभ ना तोटा होईल. मात्र तुम्ही हाती घेतलेल्या कामामुळे अनेकांना रोजगार मिळू शकेल. त्यामुळे केवळ स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार केल्यास फायदा होईल.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण शेवटी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. भविष्यातील योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो आणि आत्मविश्वास ढासळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील आणि चांगली बातमी हाती लागेल. लवकरच एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता. प्रवासाचे योग आहेत. आळस सोडून द्या, यश तुमचेच आहे.

मकर रास (Capricorn)

मकर राशीने आज शेअर बाजारात गुंतवणूक टाळावी. धनहानीचे संकेत मिळू शकतात आणि गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. व्यवसाय सुरळीत चालेल, पण त्यात ना लाभ ना तोटा होईल.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. दिवसाची सुरुवात छान होईल, पण जसजसा वेळ जाईल तसतशी बैचेनी वाढेल. मनात अनेक प्रश्न निर्माण होतील, पण उत्तरे मिळणार नाहीत.

मीन रास (Pisces)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती चांगली असली तरी पैशांचा अतिवापर टाळा. व्यवहारात सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?