AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात; तातडीने रुग्णालयात दाखल, कारचा चुराडा

भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात; तातडीने रुग्णालयात दाखल, कारचा चुराडा
bjp mp accidentImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 7:42 AM
Share

छत्तीसगडचे भाजप खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. खरोराच्या बंगोलीजवळ हा भीषण अपघात झाला. खासदार लक्ष्मी वर्मा या खरोराच्या रायपूरमधून परतत होत्या. त्यावेळी समोरून येणाऱ्या कारने धडक दिली. अपघातात खासदार लक्ष्मी वर्मा यांचा जखमी झाल्या. त्याचबरोबर या अपघातात कार चालक देखील जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरोराच्या बंगोलीजवळ कारचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोक मदतीला धावले. अपघातानंतर दोघांना जवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासदार लक्ष्मी वर्मा यांना पुढील उपचारासाठी रायपूर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यांना रायपूरमधील AIIMS मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरोराच्या बंगोली पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. खासदार लक्ष्मी वर्मा हे खरोराहून रायपूरच्या दिशेने जाताना अपघात झाला. याचदरम्यान त्यांची कार समोरून येणाऱ्या कारला धडकली. अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं.

रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू 

लक्ष्मी वर्मा यांना अपघातानंतर जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी रायपूरला दाखल करण्यात आलं. त्यांना रायपूरच्या AIIMS रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली आहे. खरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण प्रकार घडला आहे. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलीस घेत आहेत. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतलं आहे. अपघाताआधी वाहतूक कोंडी होती का, याचाही शोध घेतला जात आहे. खासदार लक्ष्मी वर्मा यांना रायपूरमधील AIIMS रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे नातेवाईक तातडीने भेटीला पोहोचले आहेत. खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या अपघाताची माहिती त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांना समजली. त्यानंतर त्यांनी तातडीने रायपूरमधील रुग्णालयात धाव घेतली. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?