Palghar Accident: Palghar Accident: भीषण दुर्घटनेने हिरावली 3 मित्रांची स्वप्न, पालघरमध्ये मोठा अपघात, 3 तरुणांचा दुर्दैवी अंत
पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळ दुचाकी आणि ट्रकचा भयंकर अपघात झाल्याची घटना घडली. अपघात इतका भीषण होता की यामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाला. पाम टेंभी गावाच्या हद्दीत भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

नावेद शेख प्रतिनिधी: पालघरमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळ दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे कोल्हापुरमधील हिट अँड रन प्रकरण गाजत असतानाच पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळ दुचाकी आणि ट्रकचा भयंकर अपघात झाल्याची घटना घडली. अपघात इतका भीषण होता की यामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाला. पाम टेंभी गावाच्या हद्दीत भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो अशी या अपघातातील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही बोईसरच्या गणेशनगर परिसरातील रहिवासी असून नांदगाव-आलेवाडी बीचच्या दिशेने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकाच वेळी तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने गणेशनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रेन अचानक सुटली, मामा भाचे गंभीर जखमी
दुसरीकडे, नाशिकच्या इगतपुरीमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. इगपुरीमध्ये पंचवटी एक्सप्रेस खाली येऊन मामा आणि भाचा गंभीर जखमी झाले आहेत. लघुशंकेसाठी 12 वर्षीय मुलगा उतरला असता गाडी लगेच चालू झाली, गाडी पकडण्यास जात असताना मुलगा घरून ट्रेन खाली पडला, भाच्याला वाचविण्यास मामा धाऊन गेला. या अपघातात भाचाला आपला पाय गमवावा लागला तर मामाच्या हाताची बोटें जाऊन मुक्का मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
घटनेनंतर लोहमार्ग पोलिस आणि आर पी एफ ने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून नाशिक पुढील उपचारासाठी रेफर येथे केले दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पंचवटी एक्सप्रेस अवघा एक मिनिट थांबत असल्याने चालणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशाची धावपळ होते, यामुळे पंचवटी एक्सप्रेसचा थांब्याची वेळ वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे.
