Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना बिल का इतके खास? स्टॅलिन-पवार इंडिया आघाडीचं गणित बिघडवणार?
Delimitation Bill 2026 MK Stalin-Sharad Pawar: केंद्र सरकार लोकसभेत राज्यघटना (132 वी सुधारणा) विधेयक, 2026 सादर करणार आहे. यामध्ये लोकसभेची कमाल सदस्य संख्या 850 आणि राज्यातील विधानसभेतील कमाल आमदारांची संख्या 650 करण्याचा प्रस्ताव आहे.

Delimitation Bill 2026 MK Stalin-Sharad Pawar: लोकसभेत महिला आरक्षण बिल लागू करण्यासाटी केंद्र सरकार पुन्हा नवीन सुधारणा विधेयक घेऊन येत आहे. यामुळे राजकीय समीकरण मात्र पार बदलून गेले आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत राज्यघटना (132 वी सुधारणा) विधेयक, 2026 सादर होईल. यामध्ये प्रत्येक राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची संख्या 50 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. दक्षिण भारतातील राज्यात त्या तुलनेत खासदार आणि आमदारांच्या जागा वाढणार नाही. योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नाही अशी जी शंका होती, ती दूर करण्याचा प्रयत्न या नवीन विधेयकाच्या माध्यमातून सरकार करणार आहे.
दरम्यान डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने नवीन प्रस्तावाविषयी सकारात्मक धोरण स्वीकारल्याने इंडिया आघाडीसमोरील अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. एप्रिलमध्ये जेव्हा हे विधेयक सादर झाले. त्यावेळी त्याविरोधात इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली. पण आता इंडिया आघाडीतील घटक दलांनी वेगवेगळे धोरण स्वीकारल्याचे समोर येत आहे.
850 पर्यंत वाढणार खासदारांची संख्या
नवीन विधेयकानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या 550 हून वाढून 850 इतकी करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये राज्यांमध्ये कमाल 815 आणि केंद्र शासित प्रदेशात 35 सदस्य असतील. तर राज्यातील विधानसभेची सदस्य संख्या कमाल 500 वरून 650 इतकी करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. नवीन प्रस्तावानुसार, प्रत्येक राज्यात लोकसभेच्या 50 टक्के जागा वाढतील. यामध्ये राज्यांमध्ये लोकसभेतील जागेनुसार प्रमाण निश्चित असेल. मागील विधेयकात याची तरतूद नव्हती. यामुळे दक्षिण राज्यांवर अन्याय होत असल्याची ओरड होत होती.
स्टॅलिन अनुकूल, शरद पवार राष्ट्रवादीचाही पाठिंबा?
या विधेयकाविरोधात एप्रिल महिन्यात विरोधकांची एकजुटता चर्चेचा विषय ठरली होती. पण यावेळी मोदी सरकारने विरोधी बाकावरील अनेक घटक पक्षांशी बोलणी केली. त्याचा परिणाम दिसून आला. डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांनी स्पष्ट केले की, तामिळनाडूची लोकसभेतील सध्याचा वाटा 7.18 टक्के कायम ठेवायला हवा. तर 1971 मधील जनगणनेच्या आधारे त्यांच्या राज्यातील प्रतिनिधित्वाचे जे निश्चित प्रमाण आहे, ते पुढील 25 वर्षापर्यंत कायम ठेवावे. डीएमकेचे संसदेत 22 खासदार आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले आहे. तर खासदार सुनेत्रा पवार, खासदार अमोल कोल्हे आणि खासदार निलेश लंके यांनी हे विधेयक वाचल्याशिवाय भूमिका स्पष्ट न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे INDIA आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
