AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delimitation Bill: उत्तर प्रदेशात 40 तर पश्चिम बंगालमध्ये 21 जागा वाढणार, महाराष्ट्रात किती खासदार वाढणार? काय आहे फॉर्म्युला? एका क्लिकवर जाणून घ्या

Delimitation Bill Maharashtra MP Seat: मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाचा बिगुल वाजला आहे. या विधेयकाला पुरेसे बहुमत मिळण्याचा विश्वास आल्यानंतर मोदी सरकारने चार दिवसीय संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. महाराष्ट्रात किती खासदार वाढणार? काय आहे प्रस्तावित फॉर्म्युला?

Delimitation Bill: उत्तर प्रदेशात 40 तर पश्चिम बंगालमध्ये 21 जागा वाढणार, महाराष्ट्रात किती खासदार वाढणार? काय आहे फॉर्म्युला? एका क्लिकवर जाणून घ्या
उत्तर प्रदेशात 40 तर पश्चिम बंगालमध्ये 21 जागा वाढणार, महाराष्ट्रात किती खासदार वाढणार? काय आहे फॉर्म्युला? एक क्लिकवर जाणून घ्या
| Updated on: Nov 28, 2026 | 6:44 AM
Share

Delimitation Bill Maharashtra MP Seat: अखेर मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला एकदाचा मुहूर्त लागताना दिसत आहे. बहुमताची जुळवाजुळव करण्यात मोदी सरकार यशस्वी झाल्यानेच संसदेचं चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विरोधी बाकावरील आणि गेल्यावेळी तटस्थ राहिलेले, मतदान प्रक्रियेतील मुकदर्शक पक्षांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी या विधेयकाला थेट पाठिंबा दर्शवल्याने सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. एप्रिल महिन्याप्रमाणे सरकार तोंडघशी पडणार नाही, याची दक्षता सरकारने घेतली आहे. नवीन विधेयकामुळे उत्तर प्रदेशात 40 तर पश्चिम बंगालमध्ये 21 जागा वाढणार आहेत, मग महाराष्ट्रात किती खासदार वाढणार? काय आहे प्रस्तावित फॉर्म्युला?

काय आहे प्रस्तावित फॉर्म्युला?

केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधयेकातील प्रस्तावाप्रमाणे, आता उत्तर दक्षिण आणि पूर्व-पश्चिम सर्व राज्यातील लोकसभेच्या जागा सरसकट 50 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. यामुळे जनगणना अहवालानुसार जागा वाढव्यात हा मुद्दाच निकाली लागला. मतदारसंघ पुनर्रचना बिल पास झाल्यास खासदारांची संख्या सध्याच्या 543 वरून थेट 815 इतकी होईल. तर वरिष्ठ सभागृह राज्यसभेतील किती जागा वाढतील वा वाढणार नाहीत याविषयी मोदी सरकारची खेळी सोमवारी समोर येण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी दिली आहे. हे दोन्ही विधेयक बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात संसदेत मांडण्यात येतील. प्रस्तावित विधेयकामुळे महिलांना संसद आणि विधिमंडळात 33 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थात काही प्रमुख विरोधी पक्षांनी या विधेयकाला उघड विरोध दर्शवला आहे.

महाराष्ट्रात किती खासदार वाढणार?

नव्या प्रस्तावानुसार, सर्व राज्यांच्या खासदारांच्या संख्येत सरसकट 50 टक्क्यांची वाढ होणार आहे. या विधेयकानुसार राज्यातील सध्याची 48 खासदारांची संख्या 72 इतकी होईल. म्हणजे महाराष्ट्रात 24 खासदार वाढतील.

सध्या उत्तर प्रदेशामधून सर्वाधिक 80 खासदार संसदेत जातात. नवीन विधेयकानुसार ही संख्या 120 इतकी होईल. देशात सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातून जातील नवीन विधेयकानुसार या राज्यात 40 खासदार वाढतील. म्हणजे देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश हा किंगमेकर म्हणून कायम राहिल.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकानुसार, प्रस्तावित बिलानुसार पश्चिम बंगालमध्ये 21, बिहारमध्ये 20, तामिळनाडूमध्ये 20, मध्य प्रदेशमध्ये 15, कर्नाटक 14, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यात प्रत्येकी 13 जागा वाढतील. ओडिशात 11 तर केरळमध्ये 10 खासदारांची भर पडेल. तेलंगणात 9, आसाम, झारखंड, पंजाबमध्ये प्रत्येकी 7 खासदार वाढतील.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?