DMart : ऑगस्ट सुरू होताच DMart मध्ये पाय ठेवायलाही जागा नाही ! महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी
सणाच्या खरेदीसाठी डी-मार्ट ग्राहकांचे मुख्य केंद्र बनले आहे. बाजारपेठेच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतींमुळे ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. एकाच ठिकाणी मासिक किराणा व रक्षाबंधनाची खरेदी शक्य असल्याने वेळेची आणि पैशांची बचत होते, ज्यामुळे डी-मार्टला मोठी पसंती मिळत आहे.

रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून देशभरात सणाच्या तयारीला वेग आला आहे. बाजारपेठांमध्ये राख्या, भेटवस्तू आणि पूजेच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत असताना, स्वस्तात आणि दर्जेदार खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या डी-मार्ट (DMart)मध्येही ग्राहकांची विशेषतः महिलांची मोठी गर्दी होत आहे. महिन्याचं राशन, घरगुती साहित्य, कपडे आणि किचनमधील वस्तूंसोबतच आता रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या वस्तूही डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक जण एकाच ठिकाणी संपूर्ण सणाची खरेदी करत आहेत. यंदा राख्यांच्या आकर्षक कलेक्शनसह विविध सणासुदीच्या वस्तूंवर मिळणाऱ्या सवलतींमुळे डी-मार्ट अनेक कुटुंबांसाठी रक्षाबंधनाच्या खरेदीचं प्रमुख ठिकाण बनलं आहे.( All Photos : Social Media)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक डी-मार्ट स्टोअर्समध्ये राख्यांसाठी स्वतंत्र विभाग सजवण्यात आला आहे. रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांच्या कलेक्शनमुळे महिलांचा या विभागाकडे विशेष ओढा दिसून येत आहे. यंदा डी-मार्टमध्ये पारंपरिक राख्या, स्टोन वर्क राख्या, मोत्यांच्या राख्या, लुंबा राख्या तसेच लहान मुलांसाठी कार्टून थीमच्या राख्यांचा मोठा संग्रह उपलब्ध आहे. प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळे पर्याय ग्राहकांना मिळत आहेत.

बाजारपेठेच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीत राख्या उपलब्ध असल्याचा ग्राहकांचा दावा आहे. त्यामुळे अनेक महिला एकाच वेळी अधिक राख्यांची खरेदी करत असल्याचं चित्र दिसत आहे. राख्यांसोबतच भावासाठी गिफ्ट पॅक्स, चॉकलेट्स, मिठाई, ड्रायफ्रूट हॅम्पर्स, पूजा साहित्य आणि गिफ्ट रॅपिंगच्या वस्तूंवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सणाची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी पूर्ण होत आहे.

डी-मार्टमध्ये महिन्याच्या किराणा खरेदीसोबतच रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या वस्तूंचीही खरेदी होत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे. हीच सुविधा अनेक कुटुंबांना आकर्षित करत आहे.

रक्षाबंधन जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत डी-मार्टमधील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विविध डिझाइन्स, परवडणारे दर आणि सणासुदीच्या ऑफर्समुळे यंदाही डी-मार्ट ग्राहकांच्या पसंतीचं शॉपिंग डेस्टिनेशन ठरत आहे.