
शरीरातून घाम येणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे, सगळ्यांना त्याची इतकी सवय झालेली असते. पण आपल्या शरीराचा असा एक भाग आहे जिथे घाम येत नाही हे आपल्या कधीच लक्षात यत नाही.

खरंतर, जेव्हा आपलं शरीर गरम होतं तेव्हा आपल्याला घाम येतो, घाम येऊन गेल्यानंतर कमी उकडतं.

आपल्या शरीरात sweat gland घामाच्य ग्रंथी असतात ज्या घाम निर्माण करतात. आणि इथेच बॅक्टेरिया तयार होतात ज्यामुळे आपल्या घामाला वास येतो.

पण आपल्या शरीराचा एक भाग असाही आहे, जिथे कधीच घाम येत नाही कारण तिथे घामाची ग्रंथी ( sweat gland) नसते.

तो भाग म्हणजे आपले मऊ, मुलायम, सुंदर ओठ. हो हे खरं आह. ओठ हा आपल्या शरीरावरील एकमेव भाग आहे, जिथे घाम येत नाही, कितीही उकडलं, गरम झालं तरी ओठांवर किंवा ओठांना घाम येत नाही.

ओठांना घाम न येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथे sweat gland नसतात, म्हणून थंडीचया दिवसात आपले ओठ लवकर फुटतात, त्यांना पटकन भेगा पडतात.