डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांत भयंकर धमकी, पाकिस्तानात अटी मान्य न केल्यास आता…इराणमध्ये थेट मृत्यू तांडव!

अमेरिका आणि इराण यांच्या प्रतिनिधींमध्ये पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. आमच्या अटी मान्य न केल्यास आम्ही थेट हल्ला करू, असे डोनाल्ड टर्म्प म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकं काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

| Updated on: Apr 19, 2026 | 7:57 PM
1 / 5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली व्हावी आणि इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेलं युद्ध संपुष्टात यावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांत एक बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली.

2 / 5
दरम्यान, आता पुन्हा एकदा सोमवारी म्हणजेच 20 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्येच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा केलेली आहे.

3 / 5
या चर्चेसाठी अमेरिकेतून कोण-कोण इस्लामाबादमध्ये जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. या धमकीमुळे जगात खळबळ उडाली आहे.

4 / 5
इराणने आमचा प्रस्ताव मान्य केला तर ठीक, अन्यथा आम्ही इराणच्या उर्जा केंद्रांना तसेच पुलांना लक्ष्य करू. ते उद्ध्वस्त करून टाकू, असा इशाराच ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. त्यामुळे काय होणार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 / 5
दरम्यान, इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगापुढे आणखी मोठे उर्जासंकट उभे राहिले आहे. इराण शत्रू तसेच शत्रू राष्ट्राच्या मित्रांची जहाजे होर्मुझमधून जाऊ देण्यास तयार नाही. त्यामुळे या बैठकीत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us