असा साप कधीच पाहिला नसेल, शिकार करण्यासाठी चक्क उडतो हवेत!

साप हे सरपटणारे प्राणी आहेत. ते जमिनीवर सरपटतात. मात्र या जगात असे काही साप आहेत, जे थेट हवेतही उडू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार हे साप साधारण 30 मिटरपर्यंत आकाशात उडू शकतात. म्हणूनच या सापांना फ्लाईंग स्नेक म्हटले जाते.

| Updated on: Aug 17, 2025 | 7:49 PM
1 / 5

2 / 5
या सापांचं नाव फ्लाईंग स्नेक म्हटले जात असले तरी ते पक्षांप्रमाणे हवेत उडत नाहीत. ते फक्त हवेत लांब उडी मारू शकतात. हवेत उडणारे साप हे क्रिसोपेलिया या प्रजातीतील आहेत. या सापांना पॅराडाईज्ड ड्री स्नेक असेही म्हटले जाते. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाच्या जंगलात हे साप आढळतात.

3 / 5
हे साप उंच झाडावर राहतात. झाडावरचे किडे, छोटे पक्षांची ते शिकार करतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचे असेल तर हे साप स्वत:ला चपटं करतात आणि हवेत उडी घेतात. या सापांनी एकदा हवेत उडी घेतली की ते एखाद्या पक्षाप्रमाणे उडू शकतात.

4 / 5
एकदा हवेत उडी घेतली तर हे साप आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळेच या सापांना हवेत उडणारे साप असे म्हटले जाते. गोल्डन ट्री स्नेक, पॅराडाईज्ड ट्री स्नेक, ट्विन बार्ड ट्री स्नेक अशा हवेत उडू शकणाऱ्या सापांच्या काही प्रजाती आहेत.

5 / 5
भारतातही हे साप आढळतात. भारतातील पश्चिमी घाटात तसेच पुर्वेकडील जंगलात हे हवेत उडणारे साप आढळतात. थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर इथेही अशा प्रकारचे साप आढळतात.