
पूर्वी तरुणवयात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता फारच कमी होती. आता वर्क कल्चर, वर्क लोड यामुळे हे प्रमाण वाढत चाललंय. हल्ली हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू व्हायचं प्रमाण खूप वाढलंय. आपण काही सवयी लावल्या, काही टाळल्या तर आपलं आरोग्य याने चांगलं राहू शकतं.

निरोगी आयुष्यासाठी, निरोगी हृदयासाठी हेल्दी फूड खूप गरजेचं आहे. हृदयविकारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर जंक फूड खाणं सोडा, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, साखर, रेड मीट आणि तळलेल्या गोष्टी खाऊ नका. हृदयाची काळजी घेण्यासाठी ताजी फळे, भाज्या, मासे यासारखे पदार्थ खायला हवीत.

अनावश्यक विचार टाळा. हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टाळायचा असेल तर नातेसंबंधातील टेन्शन, कामातील टेन्शन याने तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अतिविचार टाळा, आनंद राहायची सवय लावा.

आपण कितीही बिझी असलो तरी व्यायामासाठी वेळ काढायला हवा. एका जागी ८-१० तास बसून काम केल्यानं हार्ट अटॅकचा धोका वाढतो. व्यायामासाठी वेळ काढायला हवा. त्यासाठी वेळ नसेल तर चालायला हवं. चालणे हा देखील उत्तम व्यायाम आहे.

सिगारेट मारल्याने, मद्यपान केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते. या वाईट सवयींपासून जितक्या लवकर तुम्ही स्वतःची सुटका करून घ्याल तितकं चांगलं. अशा प्रकारची व्यसनं तुम्हाला असतील तर तुम्ही हृदयविकाराला बळी पडू शकता.