Kejriwal Sheeshmahal Photos: 5 लाखाचा जकूजी अन् 11 लाखाचे झुंबर; केजरीवाल यांचे ‘शीशमहल’ आतुन पाहिलेत का?

Kejriwal Sheeshmahal Photos: दिल्ली सरकारने शुक्रवारी 'शीश महाल'च्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २०१५ ते २०२४ या काळात या बंगल्यात राहिले होते. बंगल्यातील पलंग, सोफे आणि टेबल त्यांच्या किंमतींच्या टॅगसह प्रदर्शनासाठी मांडण्यात आले आहेत.

| Updated on: Nov 28, 2026 | 12:05 PM
1 / 9
दिल्लीतील भाजप सरकारने आजपासून, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६ फ्लॅगस्टाफ रोड येथील सरकारी बंगल्याचे दरवाजे सामान्य जनतेसाठी खुले केले आहेत. बंगल्याबाहेर ‘शीशमहल’ नावाचे बोर्ड लावण्यात आले आहे. या बंगल्याची एकूण किंमत ५८ कोटी ८३ लाख ६६ हजार ३१४ रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिल्लीतील भाजप सरकारने आजपासून, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६ फ्लॅगस्टाफ रोड येथील सरकारी बंगल्याचे दरवाजे सामान्य जनतेसाठी खुले केले आहेत. बंगल्याबाहेर ‘शीशमहल’ नावाचे बोर्ड लावण्यात आले आहे. या बंगल्याची एकूण किंमत ५८ कोटी ८३ लाख ६६ हजार ३१४ रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

2 / 9

बंगल्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि आतील सजावटीत वापरलेल्या वस्तूंची किंमतही सांगण्यात आली आहे. चला पाहूया शीशमहलात कॅमेरा गेला तेव्हा आतमध्ये काय-काय दिसले आणि त्यांच्या किंमती किती होत्या?

3 / 9

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्यात बेड, सोफा, टेबलसह प्रत्येक वस्तूवर किंमतीचे टॅग लावले आहेत. डायनिंग टेबल-खुर्च्यांची किंमत ३०.५२ लाख रुपये सांगितली गेली आहे.

4 / 9

शीशमहलमधील पडद्यांची किंमत ५ लाख रुपये आणि झुंबरची किंमत ११ लाख रुपये सांगितली गेली आहे. तसेच देवघराची किंमत 7 लाख रुपये झाली आहे.

5 / 9

शीशमहलातील स्लायडिंग दारे असलेल्या बैठकीची किंमत ४१.१६ लाख रुपये आहे. पावडर रूमची किंमत ५.८० लाख तर लॉबी एरियाची किंमत ७.५८ लाख रुपये आहे.

6 / 9

किचनमधील सामान वर-खाली नेण्यासाठी लावलेल्या डंबवेटर लिफ्टची किंमत ७ लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

7 / 9

अरविंद केजरीवाल यांचा पूर्वीचा सरकारी बंगला पाहण्यासाठी तिकिटाची किंमत सुमारे २० रुपये असू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची योजना आहे. दिल्ली सरकारने हा बंगला आजपासून खुला केला आहे. दिल्ली सरकारची योजना हा बंगला काही काळ सामान्य जनतेसाठी खुला ठेवण्याची आहे. त्यानंतर तो एका खासगी हॉस्पिटॅलिटी कंपनीकडे सोपवण्याची तयारी आहे. कंपनी तिथे सरकारी कॉन्फरन्स, लंच आणि बैठकांचे आयोजन करू शकते.

8 / 9

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना २०१५ ते २०२४ या काळात ते या बंगल्यात कुटुंबासह राहत होते. अलीकडेच दिल्ली सरकारचे दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मंत्री प्रवेश साहिब सिंह यांनी माहिती दिली होती की, ‘शीशमहल’ आता सामान्य जनताही पाहू शकेल.

9 / 9

ते म्हणाले होते, “जनतेच्या मागणीनुसार आम्ही ‘शीशमहल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करू. आम्ही लोकांना भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे उदाहरण दाखवू. एक व्यक्ती ज्याने सरकारी वाहनाचाही वापर करणार नाही असे म्हटले होते, त्याने इतर अनेक घरे पाडून स्वतःसाठी हा आलिशान निवास तयार करून घेतला.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us