Anirudh-Kavya Maran Reception : काव्या मारनच्या लग्नात श्रीलंकेचा स्पिनर मुरलीधरनच्या बायकोचा जलवा, दोन मुलांची आई, एकदम संतूर मम्मी, अभिनेत्री सुद्धा तिच्यासमोर फिक्या

Anirudh-Kavya Maran Reception : नुकतचं लग्न झालेल्या अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारनच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक स्टार्स उपस्थित राहिले. यात क्रिकेट, बिझनेस, फिल्म आणि राजकीय क्षेत्रातील स्टार्सही हजर होते.

| Updated on: Nov 24, 2026 | 5:19 PM
1 / 5
धोनी पत्नी साक्षीसह दिसला. तेच माजी श्रीलंकन गोलंदाज  मुथैया मुरलीधरनला पत्नी मधिमलार राममूर्तीसोबत हजर होता. रिसेप्शन सोहळ्यात अन्य स्टार वाइव्समध्ये मधिमलारने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं ग्लॅमरस रुप पहायला मिळालं. गोल्डन साडीमध्ये ती खूप स्टनिंग वाटली.

धोनी पत्नी साक्षीसह दिसला. तेच माजी श्रीलंकन गोलंदाज मुथैया मुरलीधरनला पत्नी मधिमलार राममूर्तीसोबत हजर होता. रिसेप्शन सोहळ्यात अन्य स्टार वाइव्समध्ये मधिमलारने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं ग्लॅमरस रुप पहायला मिळालं. गोल्डन साडीमध्ये ती खूप स्टनिंग वाटली.

2 / 5

मधिमलारचे फोटो इंटरनेटवर वायरल झाले आहेत. यात अनिरुद्ध-काव्या, रजनीकांत सोबत फोटोमध्ये पोज देताना दिसतेय. रजनीकांत सोबतचा फोटो मधिमलारने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लीडर असं लिहिलं आहे. मधिमलारने हा क्षण खूप स्पेशल असल्याचं सांगितलं.

3 / 5

मधिमलारची ब्यूटी आणि फिटनेस पाहून इंटरनेट हैराण आहे. ती खरी संतूर मॉम असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक सुरु आहे. मुरलीधरन आणि मधिमलारला दोन मुलं आहेत. ती मूळची चेन्नईची आहे. पेशाने मधिमलार बिझनेसवुमन आहे. ती एका प्रतिष्ठीत कुटुंबातून येते.

4 / 5

मधिमलारचे वडिलं डॉ. एम. राममूर्ती चेन्नईच्या प्रसिद्ध मलार हॉस्पिटल्स ग्रुपचे फाऊंडर आहेत. आई डॉ.नित्या राममूर्ति मेडिकल फिल्डशी संबंधित आहेत. लग्नाआधी त्या फॅमिली बिझनेसशी संबंधित होत्या.

5 / 5

मुरलीधरन बेवरेज बिझनेसमध्ये डायरेक्टर आहे. मुरलीधरन आणि मधिमलारने 21 मार्च 2005 रोजी तामिळ रिती-रिवाजाने लग्न केलेलं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांची लव्हस्टोरी लग्नात बदलण्यासाठी तामिळ अभिनेता वागई चंद्रशेखरने महत्वाची भूमिका बजावली होती. तो मधिमलारचा निकटवर्तीय होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us