
कोरोना नंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. येत्या 31 ऑगस्टच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. ठिकठिकाणी उत्सवाची तयारीही जोरात सुरु आहे.

यंदा मुंबईत गणेशमूर्तींची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती विक्रेत्यांच्याकडून देण्यात आली आहे.

वाढती महागाई आणि अलीकडे जीएसटी लागू झाल्याचा फटका या उत्सवालाही बसल्याचे दावा मूर्तीकार यांनी केला आहे.

दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत आहे. यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे नागरिकही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत

मुंबईत गणेशमूर्तींवर मूर्तिकारांनी शेवटचा हात फिरवत असून मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.