India vs Afghanistan : गंभीर अन् वैभव सूर्यवंशीमध्ये बराच वेळ चर्चा; प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार? सस्पेंस वाढला
Gautam Gambhir Vaibhav Sooryavanshi : भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-२० सामन्याआधी गौतम गंभीर आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

भारत-अफगाणिस्तान पहिल्या T20 सामन्यापूर्वी सराव सत्रात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीशी बराच वेळ चर्चा केली असल्याचे दिसून आले आहे.
संजू सॅमसन संघात असल्याने वैभवला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळणार की वाट पाहावी लागणार, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले असून गंभीरच्या संवादाने सस्पेंस वाढवला आहे.
कमी वयात आक्रमक फलंदाजीची क्षमता असलेल्या वैभववर गंभीरने सरावात विशेष लक्ष दिले, ज्यावरून या युवा खेळाडूवर संघ व्यवस्थापनाचा मोठा विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जपानमध्ये होणाऱ्या 2026 च्या आशियाई खेळांच्या (Asian Games) दृष्टीने भारत संघ आणि अफगाणिस्तान दोघेही या मालिकेच्या माध्यमातून आपली तयारी मजबूत करत आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यात शानदार कामगिरी केल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध विजयाने प्रारंभ करण्याच्या मानसिकतेने मैदानात उतरणार आहे.