
‘माझा होशील ना’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची झलक देत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या सौंदर्याची झलकसुद्धा देतेय.

सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केल्यानंतर गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या नव्या लूक्सची झलक तिच्या चाहत्यांना देतेय. नुकतंच मराठमोळ्या अंदाजात तिनं काही फोटो शेअर केले आहेत.

गौतमीनं आता नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिनं नऊवारी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.