फक्त 10 रुपये खर्च, घरातील मच्छरांचा लगेच होतो नायनाट, वाचा काय ट्रिक वापरायची?

घरात एकदा मच्छर झाले की फार डोकेदुखी वाढते. मच्छरांची विल्हेवाट लावाण्यासाठी तुम्ही एक घरगुती उपया करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी जास्त पैसेदेखील खर्च करण्याची गरज नाही.

| Updated on: Feb 01, 2026 | 9:20 PM
1 / 5
आजकाल मच्छर ही प्रत्येक घरातील प्रमुख समस्या बनली आहे. रात्र झाली की हे मच्छर बरोबर बाहेर येऊन चावायला लागतात. काही मच्छरांमुळे तर वेगवेगळे आजारही होतात. म्हणूनच मच्छरांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात.

आजकाल मच्छर ही प्रत्येक घरातील प्रमुख समस्या बनली आहे. रात्र झाली की हे मच्छर बरोबर बाहेर येऊन चावायला लागतात. काही मच्छरांमुळे तर वेगवेगळे आजारही होतात. म्हणूनच मच्छरांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात.

2 / 5

परंतु असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यांचा वापर केल्यास घरातील मच्छरांचा नायनाट होऊ शकतो. विशेष म्हणजे हे उपाय खर्चिकदेखील नाहीत. कांद्याच्या वरची साल, तमालपत्र, कापूर, मोहरीच तेल, एक दिवा या गोष्टी असतील तर तुम्ही मच्छरांचा नायनाट करू शकता.

3 / 5

सर्वात अगोदर गॅसवर एक पातेले ठेवून त्यात कांद्याची साल आणि तमालपत्र चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्यांना एका कागदावर टाकून हातांनी एकदम बारीक करा. त्यात कापराचे पावडर मिसळा. एक दिवा घेऊन त्यात मोहरीचे तेल घ्या.

4 / 5

त्यात तेलात कापूर, तमालपत्र आणि कांद्याच्या सालीचे पावडर टाका. त्यानंतर दिवा लावा. दिवा लावल्यानंतर बेडरुम किंवा हॉलमध्ये तो दिवा दहा मिनिटे ठेवा. ही कृती केल्यास तुमच्या घरातील मच्छर पळून जातील.

5 / 5

विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी जास्त पैसेदेखील खर्च करावे लागत नाहीत आणि मच्छरदेखील घरातून निगून जातात. (टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us