Glenn Maxwell: भारताचा जावई बनणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची लग्नपत्रिका तुम्ही बघितली?

Glenn Maxwell: ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

| Updated on: Feb 14, 2022 | 5:39 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमन सोबत तो विवाहबद्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, कोविड लॉकडाऊन यामुळे मॅक्सवेलचं लग्न रखडलं होतं.

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्या संघात मॅक्सवेलच नाव नाहीय. मॅक्सवेलची लग्नपत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पारंपारिक तमिळ भाषेत ही लग्नपत्रिका छापलेली आहे.

3 / 5
विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला आहे. 3 मार्च 1993 मध्ये जन्माला आलेल्या विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

4 / 5
14 ऑक्टोबरला मॅक्सवेलचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने इन्स्टा स्टोरीमधून विनीला मी तुझ्याशी लग्नासाठी आतुर आहे आणि 2022 हे आपलंच वर्ष असल्याचं म्हटलं होतं.

5 / 5
विना एक फार्मासिस्ट असून तिने सायन्समधूनच संपूर्ण शिक्षण घेतलं आहे. मागील वर्षी 26 फेब्रुवारी रोजी मॅक्सवेल आणि विनी यांचा साखरपुडा झाला.