Gold Rate : 18530 रुपयांनी सोने स्वस्त, ही तारीख अत्यंत महत्वाची एका महिन्यात थेट..
Gold Rate : सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव धाडकन कोसळला. त्यातच तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला. पुढील काही दिवसात सोन्याचे भविष्य ठरणार आहे. त्यातच अमेरिकेतील घडामोडींना वेग आला.

सोन्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच मागील काही दिवसांचा विचार करताना सोन्यात घसरण झाली. काल सोन्याचा भाव अडीच हजारांनी वाढला. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली.
एका महिन्यात सोने एक तोळे तब्बल 18530 रूपयांनी स्वस्त झाले. अनेक लोकांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे. पण सोन्याचे भाव अजून कोसळणार की वाढणार यामध्ये अनेक लोक संभ्रमित आहेत.
सोन्याचे दर अमेरिकेतील आर्थिक गोष्टींवर अवलंबून आहेत. 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान अमेरिकेतील महागाई आणि रोजगार यांचे आकडेवारी जाहीर होईल, त्यावर सोन्याचे भविष्य ठरवले जाईल.
देशांर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात एका महिन्यात 13 टक्क्यांनी घसरण झाली. 23 ऑक्टोबरला 10 ग्रॅम सोन्याचा दर 145430 रूपये तोळा सोने होते. एका महिन्यातच सोने तब्बल18 हजारांनी घसरले.
या घसरणीमुळे सोने खरेदी करणेअ अधिक सोप्पे झाले. त्यातच कोटक निओच्या कमोडिटी आणि करन्सीचे हेड अनिंद्य बॅनर्जी यांच्यामते सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. जानेवारी 2027 मध्ये सोने निचांकी गाठण्याची शक्यता आहे.