Gold Price | सोन्याचा भाव थेट 3.20 लाखांवर जाणार; भारतीय ग्राहकांचं टेन्शन वाढलं, काय आहे कारण?
सोन्याच्या दराबाबत मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 10,000 डॉलर्सपर्यंत, तर भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 3 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या बॉण्ड बाजारावरील दबाव आणि डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या दराला मोठी झळाळी मिळू शकते, असा अंदाज जेफरीजचे ख्रिस वूड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोन्याच्या भावातील या संभाव्य मोठ्या वाढीकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

सोन्याच्या दराबाबत बाजारात सध्या मोठी चर्चा सुरू असून, भविष्यात भाव आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस तब्बल 10,000 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.
सोन्याचा भाव या पातळीवर गेल्यास भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 3 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जेफरीजचे जागतिक इक्विटी स्ट्रॅटेजी प्रमुख ख्रिस वूड यांनी सोन्याच्या भविष्यातील दराबाबत हा अंदाज व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या बॉण्ड बाजारावरील दबाव वाढल्यास आणि डॉलर कमजोर झाल्यास सोन्याला त्याचा फायदा होऊ शकतो, असे वूड यांनी म्हटले आहे. डॉलरमधील घसरण आणि अमेरिकन ट्रेझरी यील्डवरील दबाव हे सोन्याच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक ठरू शकतात. .
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे 4,366.80 डॉलर्स असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. एका डॉलरची किंमत ₹96 गृहीत धरल्यास सध्याच्या आंतरराष्ट्रीय दरानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे ₹1.35 लाख होते.
मात्र, आंतरराष्ट्रीय दर आणि भारतातील प्रत्यक्ष सोन्याचा बाजारभाव यामध्ये कर, आयात शुल्क आणि इतर खर्चांमुळे फरक असू शकतो. सोन्याचा भाव 10,000 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचेल का, याकडे आता गुंतवणूकदार आणि सोन्याच्या ग्राहकांचे लक्ष लागले आहे.