Gold Price Crash : धाड.. धाड कोसळले सोने, चांदीनेही टाकली मान, सोने खरेदीची सुवर्णसंधी, आज सोन्याचा भाव..
Gold Price Today : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढउतार बघायला मिळत आहे. त्यातच आजही सोन्याच्या भावात उलटफेर झाला आहे. सराफा बाजारात वारे फिरल्याचे यावरून दिसत आहे. नुकताच आजचा सोने आणि चांदीचा भाव जाहीर झाला.

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती झपाट्याने घसरताना दिसल्या. मात्र, दोन दिवसात कमी अधिक भाव होताना दिसले. सोन्यात घसरण होत असताना अचानक सोन्याचा भाव अडीच हजाराने वाढला.
तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण होईल. त्यातच आता 25 नोव्हेंबर 2026 चा सोन्याचा भाव पुढे आला. आजही सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली.
सोने आणि चांदीचे भाव उच्चांकी पोहोचले असतानाच त्याच्यात आता घसरण होत आहे. एक दिवस भावात वाढ झाली आणि आता पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली. जाणून घ्या आजच्या सोन्याच्या किंमती
सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा घसरण झाली. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत 533 रुपयांची घसरण झाली. 10 ग्रॅम सोने 1 लाख 21 हजार 796 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीच्या भावात 738 रूपयांनी घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही दोन्ही धातूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोने 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति औंस 3, 547 डॉलर्सवर आले आहे. सतत सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार बघायला मिळतोय.