Gujarat Trip : गुजरातला फिरायला जाताय? ही आहेत सर्वात बेस्ट ठिकाणे
gujarat tourism : गुजरातला जात असाल, तर तुमच्यासाठी महत्वाचा लेख आहेे. गुजरातमध्ये अनेक प्रसिद्ध शहरे आहेत.

भारताच्या पश्चिम भागात गुजरात राज्य आहे. गुजरातमध्ये अनेक धार्मिक स्थळ, ऐतिहासिक ठिकाणे आहेत. गुजरातला आशियातील वाघांचं घर मानलं जातं.
गुजरातमध्ये अनेक वन्य प्राण्यांचं अभयारण्य आहेत. गुजरातमध्ये मरीन नॅशनल पार्क, फॉरेस्ट नॅशनल पार्क, ब्लॅककब नॅशनल पार्क, कच्छ डेजर्ट सारखे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
तसेच गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, लक्ष्मी विलास पॅलेस, अक्षरधाम मंदिर, साबरमती मंदिर, गांधी संग्रहालय , स्वामी नारायण, द्वारका मंदिर सारखे प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
तुम्ही प्रवासाची सुरवात वडोदरा येथून करू शकता. त्यानंतर वडोदरा संग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस, अरबिंदो आश्रम हे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. वडोदरा ते अहमदाबादचं अंतर 111 किमी इतकं आहे. अहमदाबादमध्ये तुम्ही साबरमती आश्रमला भेट देऊ शकता.
वडोदरा ते राजकोट हा चार तासांचा प्रवास आहे. राजकोटमध्ये अनेक मंदिरे आहेत .तसेच राजकोटहून 225 किमी अंतरावर द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, द्वारका समुद्र किनारा, रुक्मिणी मंदिराला भेट देऊ शकता.