Mithun Chakraborty :’म्हणून दिग्गज गायकाच्या लेकाने गायलं रोमँटिक गाणं’, बघताच येते 80 दशकाची आठवण, आजही प्रचंड सुपरहिट

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम पांच' या चित्रपटातील एक गाणे आजही संगीतप्रेमींच्या आठवणीत आहे. भोजपुरी शब्दांच्या'का जानू मैं सजनिया' या गाण्यात मिथुन चक्रवर्ती आणि दीप्ती नवल यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या गाण्याला दिग्गज गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार आणि लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता.

| Updated on: Nov 17, 2026 | 2:16 PM
1 / 5
का जानू मैं सजनिया' या गाण्यात भोजपुरी भाषेचा खास लहेजा ऐकायला मिळतो. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केले जात होते. या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

का जानू मैं सजनिया' या गाण्यात भोजपुरी भाषेचा खास लहेजा ऐकायला मिळतो. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केले जात होते. या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

2 / 5

या गाण्याला किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार आणि लता मंगेशकर यांनी आवाज दिला आहे. आनंद बक्षी यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते.

3 / 5

या गाण्यात मिथुन चक्रवर्ती यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि दीप्ती नवल यांचा साधेपणा लक्ष वेधून घेतो. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री गाण्याला अधिक सुंदर बनवते. त्यामुळे हे गाणे आजही जुन्या आठवणी ताज्या करते.

4 / 5

का जानू मैं सजनिया, चमकेगी कब चंदनिया' या ओळी गाण्याचे आकर्षण वाढवतात. प्रेम, विरह आणि भेटण्याची ओढ या भावनांचे दर्शन त्यातून घडते. त्यामुळे हे गाणे आजही संगीतप्रेमींना आवडते.

5 / 5

हम पांच' हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. बापू यांनी दिग्दर्शन केले होते, तर बोनी कपूर यांनी निर्मिती केली होती. संजीव कुमार, शबाना आझमी, मिथुन चक्रवर्ती, दीप्ती नवल, नसीरुद्दीन शाह, राज बब्बर आणि अमरीश पुरी यांसारखे कलाकार या चित्रपटात होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us