‘दुआ में याद रखना…?’ कॅन्सरशी झुंज देत असलेल्या हिना खानने केला पहिला रोजा पूर्ण, चाहत्यांनाही एक विनंती

कॅन्सरशी झुंज दे  हिना खानने 2025 च्या रमजानचा पहिला उपवास पूर्ण केला आहे. तिने सेहरीपासून इफ्तारपर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने तिच्या आईसोबत इफ्तारचा आनंद लुटलेलाही या फोटोंमध्ये दिसत आहे. तिच्या पोस्टमध्ये तिने तिच्या चाहत्यांना रमजान मुबारकची शुभेच्छा दिल्या आहेत आणि एक विनंतीही केली आहे, 

| Updated on: Mar 03, 2025 | 4:32 PM
1 / 8
अभिनेत्री हिना खानने 2025 च्या रमजानचा पहिला उपवास पूर्ण केला आहे. तिने सेहरीपासून ते इफ्तारीपर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हिना खानने इफ्तारीसाठी सुंदर हिरवा सलवार कमीज घातला होता. तिने तिचा लूक सुंदर झुमक्यांनी पूर्ण केला होता.

2 / 8
पोस्टमध्ये हिना खान काही स्वादिष्ट पदार्थांसह पोज देताना दिसत आहे.

3 / 8
इफ्तारी टेबलावर सर्व प्रकारचे चविष्ट पदार्थ ठेवलेलेही दिसत आहेत.

4 / 8
एका फोटोमध्ये हिना खान तिच्या आईसोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिनाने पोस्टला  'रमजान मुबारक, मी कशी दिसतेय, पहिला दिवस, सेहरी ते इफ्तारी पर्यंतचा सुंदर प्रवास.' कृपया तुमच्या प्रार्थनेत माझी आठवण ठेवा" असं कॅप्शनही दिलं आहे.

5 / 8
हिना खानने यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रमजानमधील तिच्या दिनचर्येबद्दल माहिती शेअर केली होती. हिनाने तिच्या नवीन वर्कआउट सेशनची एक क्लिप देखील पोस्ट केली होती,

6 / 8
 तिने रमजानमध्ये उपवास ठेवून तिची दैनंदिन दिनचर्या चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितलं होतं. हिनाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मी माझा दैनंदिन दिनक्रम राखण्याचा प्रयत्न करत आहे. मी हळूहळू पुढे जात आहे. रमजानचा पहिला दिवस... कसे आहात मित्रांनो?" असं कॅप्शनही दिलं होतं.

7 / 8
हिना खानने तिच्या इंस्टा चाहत्यांशीही संवाद साधला, 'तुम्ही उपवास करत आहात का?' मी तर करणार आहे.'  हिना खानने सांगितले होते की शस्त्रक्रियेनंतर तिला 'चालणे कठीण' झाले होते. ती म्हणाली होती की या टप्प्यातून जाणं तिच्यासाठी फारच कठीण होतं.

8 / 8
हिना खानने तिच्या वर्कआउट सेशनचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. वर्क आउट सुरु ठेवणं जरा कठीण जात आहे, विशेषतः मोठ्या शस्त्रक्रियेनंतर, पण मी हार मानत नाही.' असं कॅप्शन हिनाने दिलं होतं.