AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan एक हफ्ता चुकला तर बँक लगेच घर जप्त करते का? RBI चे हे नियम तुम्हालाही माहिती असायलाच हवे

होम लोनचा हप्ता चुकला तर बँक घर जप्त करू शकते का? आरबीआय (RBI) आणि सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदारांना मिळणारे कायदेशीर अधिकार आणि जप्ती टाळण्याचे उपाय याबद्दल सविस्तर माहिती.

| Updated on: Feb 24, 2026 | 3:05 PM
Share
स्वतःच्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न सत्यात उतरावं, यासाठी अनेकजण बँकेकडून होम लोन घेतात. मात्र, सध्याच्या महागाईच्या काळात किंवा काही आर्थिक संकटामुळे एखाद्याचे घराचे हफ्ते चुकतात.

1 / 8
जर घराचा हफ्ता चुकला, तर मनात पहिली भीती येते ती म्हणजे बँक घर जप्त तर करणार नाही ना? अनेकदा कर्जदारांना असं वाटतं की जर एक हफ्ता चुकला की बँक थेट आपल्याला जप्तीची नोटीस पाठवेल. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि 'सरफेसी कायदा' (SARFAESI Act) अंतर्गत कर्जदारांना काही विशेष संरक्षण देते.

2 / 8
बँकिंग तज्ज्ञांच्या मते, केवळ एक हफ्ता चुकला म्हणून बँक तुमचे घर जप्त करू शकत नाही. पहिला हफ्ता चुकला की बँक तुम्हाला डिफॉल्टर मानत नाही. सुरुवातीला बँक केवळ फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे हफ्ता भरण्याची आठवण करून देते. यावेळी तुम्हाला काही प्रमाणात लेट पेमेंट चार्जेस (Late Payment Charges) भरावे लागतात.

3 / 8
बँकेला जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमचे कर्ज खाते एनपीए (NPA - Non-Performing Asset) होणे आवश्यक असते. जर तुम्ही सलग ९० दिवस म्हणजे ३ महिने एकही हफ्ता भरला नाही, तरच बँक तुमचे खाते NPA घोषित करते. खाते NPA झाल्यानंतरच बँक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करू शकते.

4 / 8
बँकेला घर जप्त करण्यासाठी सरफेसी कायदा २००२ मधील तरतुदींचे पालन करावे लागते. खाते NPA झाल्यावर बँक तुम्हाला कलम १३(२) अंतर्गत नोटीस पाठवते. यात तुम्हाला थकबाकी भरण्यासाठी ६० दिवसांचा अवधी दिला जातो.

5 / 8
नोटीस मिळाल्यावर कर्जदार बँकेला उत्तर देऊ शकतो. जर उशीर होण्याचे कारण रास्त असेल, तर बँक हप्ते पुन्हा ठरवून (Restructure) देऊ शकते. जर ६० दिवसांनंतरही प्रतिसाद न मिळाल्यास, बँक घराचा प्रतिकात्मक ताबा घेते आणि लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करते.

6 / 8
जरी तुम्ही हफ्ता भरू शकला नाही, तरी तुमचे काही कायदेशीर अधिकार अबाधित राहतात. घराचा लिलाव करताना ती किंमत बाजारभावानुसार असावी. तसेच, लिलावातून बँकेचे कर्ज फिटल्यानंतर जर काही रक्कम उरली, तर ती कर्जदाराला परत करणे बँकेला बंधनकारक असते.

7 / 8
त्यामुळे, जर तुमच्या घराचा हफ्ता चुकला असेल तर घाबरून जाऊ नका. अशावेळी सर्वात आधी बँकेशी संपर्क साधा. त्यांना तुमची अडचण सांगा, हा तुमच्यासाठी सर्वात उत्तम मार्ग ठरेल.

8 / 8
Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?