घरातील झुरळं झटक्यात संपून जातील, फक्त वापरा ही सोपी ट्रिक; चमत्कार झालाच म्हणून समजा!

घरात झुरळ दिसले की फार चिडचिड होते. कितीही सफाई केली तरी झुरळ मात्र कमी होताना दिसत नाहीत. परंतु एक ट्रिक वापरल्यास झुरळांचा नायनाट होतो. ही ट्रिक काय आहे ते जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 04, 2026 | 6:29 PM
1 / 5
घरात झुरळ निघण्याची समस्या ही जवळपास प्रत्येकच घरात असते. कितीही स्वच्छता केली तरी काही वेळाने झुरळ निघतेच. त्यामुळे घरातील गृहिणी फारच त्रस्त असतात. विशेषत: रात्रीच्या वेळी हे झुरळ बाहेर निघतात. स्वयंपाकघरातही झुरळांचे प्रमाण जास्त असते.

2 / 5
परंतु तुम्ही काही ट्रिक्स वापरल्या तर घरातील झुरळ लगेच निघून जातात. विशेष म्हणजे भविष्यातही झुरळांचा त्रास कमी होतो. रात्री घरात झुरळ शिरत असतील तर घरातील पाणी ज्या ठिकाणाहून बाहेर जाते, तिथे ही गोष्ट ठेवल्यास झुरळ लगेच नाहीसे होतात.

3 / 5
ही वस्तू काय आहे ते जाणून घेऊ या...किचनमधील सिंक, नळ तसेच बाहेरच्या सांडपण्याच्या मार्गाजवळ झुरळ निघत असतील तर त्यांना हाकलून लावण्यासाठी एक खास मिश्रण तयार करावे. हे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा हळद, एक चमचा मीठ आणि दोन चमचे लिक्विड डेटॉल घ्यावे.

4 / 5
सोबतच एक चमचा पाणीदेखील घ्यावे. या चार वस्तू एकमेकांत चांगल्या पद्धतीने मिसळाव्यात. एक कॉटन पॅड घेऊन तो या मिश्रणात बुडवावा आणि तो कॉटन नळाचे सिंक, बाथरुम, वॉशबेसीन या ठिकाणी ठेवावा. घरातील कोपऱ्यातही हे कॉटन पॅड ठेवावेत.

5 / 5
झुरळं शक्यतो घराच्या कोपऱ्यात, सामानाची गर्दी असेल त्या ठिकाणी लपलेले असतात. या कॉटन पॅडमुळे झुरळ घरात घुसत नाहीत. कालांतराने झुरळाचा त्रास कमी होतो. घराची नियमित सफाई करावी. यामुळेदेखील घरातील झुरळं कमी होण्यास मदत मिळते.