गावाकडच्या जेवणाची आठवण करून देणारं कुळीथाचं पिठलं; कमी वेळात असं करा तयार

कुळीथाचं पीठ, लसूण, हिरवी मिरची आणि कांद्याच्या फोडणीपासून बनणारं हे पिठलं चवीला खमंग लागते. गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा आणि घरच्या घरी गावाकडच्या जेवणाचा आस्वाद घ्या.

| Updated on: Oct 13, 2026 | 6:52 PM
1 / 8
आजीच्या हातचं पिठलं म्हटलं कि त्यात लसणाचा खमंग स्वाद, हिरव्या मिरचीचा ठसका आणि फोडणीचा सुगंध. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारं हे पिठलं भाकरीसोबत खायला एकदम भारी लागतं.

आजीच्या हातचं पिठलं म्हटलं कि त्यात लसणाचा खमंग स्वाद, हिरव्या मिरचीचा ठसका आणि फोडणीचा सुगंध. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारं हे पिठलं भाकरीसोबत खायला एकदम भारी लागतं.

2 / 8

साहित्य : 1 वाटी कुळीथ , 2 ते 3 वाटी पाणी, कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, हळदं, लाल तिखट,मीठ, तेल आणि कोथिंबीर, पिठलं किती घट्ट हवं त्यानुसार पाण्याचे प्रमाण

3 / 8

कुळीदाच्या पीठात पाणी तयार करा :भांड्यात कुळीदाचं पीठ घेऊन त्यात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. मिश्रणात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. कालवल्यामुळे व्यवस्थित शिजण्यास मदत होते.

4 / 8

लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा :पिठळ्याल्या खमंग चव आणायटची असेल तर लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा भरडसर ठेचा करून घ्या. लसूण आणि मिरचीचा हा ठसका पिठळ्याची चव वाढवतो. तिखटाच्या प्रमाणानुसार मिरच्या कमी जास्त कराव्या.

5 / 8

फोडणीत कांदा परतून घ्या :कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरं घाला. ते तडतडलं कि लसूण - मिरचीचा ठेचा आणि बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मऊ होऊन हलकासा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर हळद तिखट घालून मिश्रण हलवत राहा.

6 / 8

फोडणीत कुळीदाचं मिश्रण घाला :आता तयार केलेलं कुळीदाचं मिश्रण कढईत हळूहळू ओता.दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा. गुठळ्या होऊ देऊ नका. चवीनुसार मीठ घालून पिठलं मध्यम आचेवर शिजवून घ्या.

7 / 8

पिठलं घट्ट होईपर्यंत शिजवा :पिठलं शिजताना हळूहळू घट्ट होऊ लागेल. ते कढईला चिटकू देऊ नका. त्यासाठी ढवळत राहणे महत्त्वाचे आहे.नाहीतर पिठलं भांड्याला चिटकेल आणि करपून जाईल.

8 / 8

कोथिंबीर घालून सर्व्ह करा :पिठलं तयार झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गॅस बंद करून पिठलं काहील क्षण झाकून ठेवा. त्यामुळे कोथिंबिरीची चव त्यात मुरेल आणि छान सुगंधही येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us