
दिवाळी संदर्भात अशी एक गोष्ट आहे जी लहानपणापासून आपल्याला चांगली लक्षात आहे. आपल्याला चांगली माहित आहे आणि आपण जी न चुकता फॉलो करतो. सांगा पाहू कोणती? उटणं!

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर तुम्ही या पद्धतीचं उटणं तयार करून बघा. दोन चमचे बेसन, दोन चमचे दूध पावडर, दोन चमचे चंदन पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक ते दीड चमचा मध, अर्धा चमचा हळद. एका बाऊलमध्ये या सगळ्या गोष्टी मिक्स करा आणि त्यात गुलाबपाणी किंवा दूध टाकून त्याची पेस्ट तयार करा

हे उटणं जेव्हा तुम्ही घरी तयार करता तेव्हा ते अधिक फायदेशीर ठरते. हलक्या हातांनी हे उटणं चेहऱ्याला लावा. साधारण २० मिनिटे हे उटणं चेहऱ्याला लावून ठेवा. हे उटणं नुसतं चेहऱ्यावर नाही तर तुम्ही हातापायावर लावू शकता. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

जर तुम्हाला चमकदार चेहरा हवा असेल तर तुमच्याकडे फक्त काही गोष्टी असायला हव्यात. बेसन, चंदन पावडर, हळद पावडर, बदामाचं तेल. एक चमचा चंदन पावडर घ्या, दोन चमचे बेसन, अर्धा चमचा हळद पावडर घ्या. आधी त्वचा बघा, कोरडी पडली असेल तर त्यात बदामाचं तेल घाला. हे सगळं एकत्र करून यात दूध घालून उटणे तयार करून घ्या.

हे उटणे चेहऱ्याला १५ ते २० मिनिटे लावून ठेवा यानंतर चेहरा स्वच्छ करा. सगळ्यात महत्त्वाचं हे उटणे लावून झाल्यानंतर पुढचे ५-६ तास चेहऱ्याला फेस वॉश लावू नका.