Nashik Political Shakeup: नाशकात भाजपचा भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना मोठा धक्का; मनसे अन् ठाकरे नेत्यांच्या हाती ‘कमळ’
नाशिकमध्ये भाजपने मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मनसेचे दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत हा धक्कादायक घडामोड झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकमध्ये भाजपने नुकताच एक मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनसेचे मोठे नेते दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ तसेच काँग्रेसचे शाहू खैरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे, बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच ही घडामोड झाली, ज्यामुळे ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशावेळी दिनकर पाटील यांनी केवळ “विकासासाठी” भाजपमध्ये जात असल्याचे नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण त्यांनी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष केला होता. भाजपमध्ये या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला होता. दरम्यान, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप प्रवेशाआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?

