Snakes Safety Tips: हिवाळ्यात साप घरात का येतात? सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ 6 गोष्टी आवर्जून करा
Snakes Safety Tips: अनेकदा तुम्ही बघितलं असेल की हिवाळ्यात थंड वातावरण झालं की साप तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात येतात. या सापांपासून स्वतःचा बचाव करण्याचे काही उपाय जाणून घ्या.

घराच्या आसपास स्वच्छता ठेवा: अंगण, बाग किंवा बाल्कनीमध्ये सुकलेली पाने, लाकडाचे ढीग, विटा आणि भंगार जमा होऊ देऊ नका. अशा अंधाऱ्या जागांमध्ये साप लपण्याची शक्यता असते.
घरातील भेगा आणि छिद्रे बंद करा: दरवाजांच्या खालच्या फटी, खिडक्यांमधील मोकळ्या जागा आणि भिंतींमधील भेगा व्यवस्थित बंद करा. खिडक्यांना जाळ्या लावा, जेणेकरून साप घरात शिरू शकणार नाहीत.
उंदीर आणि कीटकांवर नियंत्रण ठेवा: उंदीर आणि इतर छोटे जीव हे सापांचे खाद्य असतात. त्यामुळे घरात उंदरांचा वावर होणार नाही याची काळजी घ्या आणि अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा.
बूट आणि कपडे तपासून वापरा: बाहेर ठेवलेले बूट, हेल्मेट, कपडे किंवा जुने बॉक्स वापरण्यापूर्वी तपासून घ्या. विशेषतः बूट घालण्याआधी ते हलवून पाहा, कारण साप त्यामध्ये लपलेले असू शकतात.
घरातील अनावश्यक वस्तू हटवा: घराच्या कोपऱ्यांमध्ये, जिन्याखाली किंवा स्टोअर रूममध्ये जुने सामान आणि भंगार साठवू नका. सापांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही, याची काळजी घ्या. केवळ नीम तेल, फिनाइल किंवा रॉकेलच्या वासावर साप दूर राहतील असा विश्वास ठेवू नका.
साप दिसल्यास घाबरू नका: घरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा, मुलांना आणि पाळीव प्राण्यांना दूर करा आणि स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना त्वरित संपर्क करा.