तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय? सोप्या ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड

तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल किंवा स्लो चालत असेल, तर या सोप्या टिप्स वापरा. कॅशे मेमरी क्लिअर करण्यापासून ते सॉफ्टवेअर अपडेटपर्यंत, तुमचा फोन सुपरफास्ट करण्याच्या खास ट्रिक्स येथे जाणून घ्या.

| Updated on: Feb 04, 2026 | 3:56 PM
1 / 6
आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जेव्हा हाच फोन स्लो होतो किंवा अडकायला लागतो, तेव्हा कामात व्यत्यय येतो. फोन जुना झाला की त्याचा वेग मंदावणे स्वाभाविक असले, तरी काही सेटिंग्ज बदलून तुम्ही त्याचा परफॉर्मन्स सुधारू शकता.

आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जेव्हा हाच फोन स्लो होतो किंवा अडकायला लागतो, तेव्हा कामात व्यत्यय येतो. फोन जुना झाला की त्याचा वेग मंदावणे स्वाभाविक असले, तरी काही सेटिंग्ज बदलून तुम्ही त्याचा परफॉर्मन्स सुधारू शकता.

2 / 6

अनेकदा ॲप्स वापरताना मोठ्या प्रमाणात कॅशे डेटा जमा होतो. यामुळे मेमरी भरते आणि फोन स्लो होतो. फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन वेळोवेळी Clear Cache करणे फायद्याचे ठरते.

3 / 6

आपण अनेकदा असे ॲप्स डाऊनलोड करतो जे नंतर कधीच वापरत नाही. हे ॲप्स बॅकग्राउंडला सुरू राहतात आणि रॅम (RAM) वापरतात. त्यामुळे नको असलेले ॲप्स त्वरित काढून टाका.

4 / 6

कंपन्या वेळोवेळी सिस्टिम अपडेट्स पाठवत असतात. यामध्ये बग फिक्स आणि परफॉर्मन्स सुधारण्यासाठीचे बदल असतात. तुमचा फोन नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट ठेवा.

5 / 6

जर तुमच्या फोनचे इंटरनल स्टोरेज ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरला असेल, तर तुमचा फोन स्लो होईलच. फोटो, व्हिडीओ क्लाऊडवर (Google Photos) सेव्ह करा आणि फोनची मेमरी मोकळी ठेवा.

6 / 6

जर वरील सर्व उपाय करूनही फोन नीट चालत नसेल, तर शेवटचा पर्याय म्हणजे फॅक्टरी रिसेट. यामुळे फोनमधील सर्व डेटा पुसला जाईल आणि फोन सॉफ्टवेअरच्या बाबतीत पुन्हा नवीनसारखा होईल. पण फोन रिसेट करण्यापूर्वी बॅकअप नक्की घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us