हायला ! मोबाईल सुद्धा नकली मिळतो? असली नकली कसा ओळखायचा ? तज्ज्ञांनी सांगितली ट्रिक

नकली उत्पादनं ही हुबेहूब अस्सल उत्पादनांसारखीच दिसतात, परंतु गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता या बाबतीत ती अस्सल उत्पादनांच्या आसपासही नसतात. अनेकदा, मोठ्या ब्रँड्सच्या नावांना भुलून ग्राहक फसवणुकीला बळी पडतात आणि त्यांच्या हाती नकली उत्पादने येतात. नकली आणइ असली फोन यातला फरक कसा ओळखायचा ?

| Updated on: Sep 18, 2026 | 5:41 PM
1 / 9
 आजकाल बाजारात सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या बनावट आवृत्त्या उपलब्ध असतात — मग ते ब्रँडेड शूज असो  वा कपडे, घड्याळं, सौंदर्यप्रसाधनं, इअरबड्स असोत किंवा अगदी स्मार्टफोन्सही. अनेकदा, सेलदरम्यान स्वस्त दरात वस्तू मिळवण्याच्या घाईगडबडीत लोकांच्या हाती बनावट फोन लागल्याचे प्रकार घडले आहेत.

आजकाल बाजारात सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या बनावट आवृत्त्या उपलब्ध असतात — मग ते ब्रँडेड शूज असो वा कपडे, घड्याळं, सौंदर्यप्रसाधनं, इअरबड्स असोत किंवा अगदी स्मार्टफोन्सही. अनेकदा, सेलदरम्यान स्वस्त दरात वस्तू मिळवण्याच्या घाईगडबडीत लोकांच्या हाती बनावट फोन लागल्याचे प्रकार घडले आहेत.

2 / 9

खरंतर, नकली उत्पादनं ही दिसायला अगदी अस्सल उत्पादनांसारखीच असतात, परंतु गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता या बाबतीत ती मूळ उत्पादनांच्या तुलनेत खूपच निकृष्ट दर्जाची असतात. मोठ्या ब्रँड्सच्या नावाखाली अनेकदा ग्राहकांची फसवणूक करून त्यांना नकली उत्पादनं विकली जातात— विशेषतः मोबाईल फोन्सच्या बाबतीत हे अधिक घडतं.

3 / 9

त्यामुळे, एखादा फोन खरेदी करण्यापूर्वी—मग तो एखाद्या दुकानातून असो किंवा सेल (sale) दरम्यान—तो अस्सल आहे की नाही, हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा, तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.

4 / 9

प्रत्येक मोबाईल फोनचा 15-अंकी IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) क्रमांक असतो. सेलदरम्यान मिळालेला फोन अस्सल आहे की बनावट, हे तपासण्यासाठी तुम्ही सरकारच्या 'संचार साथी' (Sanchar Saathi) पोर्टलचा वापर करू शकता.

5 / 9

https://sancharsaathi.gov.in या लिंकवर जाऊन 'संचार साथी' (Sanchar Saathi) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

6 / 9

होमपेजवर, 'Citizen Centric Services' या ऑप्शनवर क्लिक करा.

7 / 9

त्यानंतर, 'Know Your Mobile/IMEI Verification' हा ऑप्शन निवडा.

8 / 9

ओटीपी (OTP) मिळवण्यासाठी कॅप्चा (captcha) आणि तुमचा मोबाईल क्रमांक तिथे भरा; त्यानंतर पुढे जाण्यासाठी तो ओटीपी सबमिट करा. ओटीपी टाकल्यानंतर, स्मार्टफोनचा 15-अंकी IMEI क्रमांक टाका आणि तो सबमिट करा.

9 / 9

या प्रक्रिया पूर्ण केल्यावर, तुम्हाला त्या डिव्हाइसबद्दलची माहिती मिळेल; उदा- त्याची स्थिती (status), ब्रँड, मॉडेल, डिव्हाइसचा प्रकार आणि निर्मितीविषयक माहिती, हे सगळं समजेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us