महत्त्वाचे Gmail मेल वारंवार Spam मध्ये जातायत? सेटिंग्स कश्या बदलायच्या जाणून घ्या

ऑफिस, कॉलेज किंवा कंपनीकडून आलेला महत्त्वाचा Email Spam Folder मध्ये गेल्यास तो सहज दुर्लक्षित होऊ शकतो. अशावेळी Gmail मधील काही सेटिंग्सचा वापर करून महत्त्वाचे मेल Inbox आणता येतो.

| Updated on: Oct 03, 2026 | 4:59 PM
1 / 7
ऑफिसचा मेल असो, कॉलेजचा महत्त्वाचा अपडेट असो किंवा एखाद्या कंपनीकडून आलेला मेल... तो inbox मध्ये येण्याऐवजी थेट  spam folder मध्ये गेला तर तो सहज नजरेआड होऊ शकतो. विशेष म्हणजे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा किंवा विश्वासू कंपनीचा Email वारंवार spam मध्ये जात असेल तर Gmail मधील काही सेटिंग्सच्या मदतीने ही समस्या कमी करता येते

ऑफिसचा मेल असो, कॉलेजचा महत्त्वाचा अपडेट असो किंवा एखाद्या कंपनीकडून आलेला मेल... तो inbox मध्ये येण्याऐवजी थेट spam folder मध्ये गेला तर तो सहज नजरेआड होऊ शकतो. विशेष म्हणजे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा किंवा विश्वासू कंपनीचा Email वारंवार spam मध्ये जात असेल तर Gmail मधील काही सेटिंग्सच्या मदतीने ही समस्या कमी करता येते

2 / 7

सगळ्यात आधी gmailD उघडा आणि spam folder मध्ये जा. तिथे महत्त्वाचा Emial दिसला तर तो उघडून 'not spam' हा पर्याय निवडा. यामुळे तो मेल spam मधून बाहेर येईल. यानंतर त्याच sender कडून येणारे मेल spam मध्ये जाणार नाही.

3 / 7

ज्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे Emial वारंवार spam मध्ये जातात. त्यांचा Emial address google contacts मध्ये सेव्ह करून ठेवा. यासाठी google contacts उघडून नवीन contact तयार करा आणि संबंधित Emial address सेव्ह करा.

4 / 7

एखाद्या ठराविक sender चा मेल नेहमी inbox मध्येच हवा असेल तर gmail मध्ये filter तयार करता येतो.computer वर gmail, उघडा आणि search bar मधील show research option" वर क्लिक करा. "from" या पर्यायात संबंधित sender चा email address टाका आणि create filter निवडा.

5 / 7

filter तयार करताना 'never send it to spam हा पर्याय निवडा. त्यानंतर "create filter" वर क्लिक करा. त्यामुळे त्या sender कडून येणारे Emial Spam मध्ये जाऊ नयेत. यासाठी gmail ला सूचना देता येतो.

6 / 7

android फोन, iPhone किंवा tablet वर Gmail app उघडा. menu मध्ये जाऊन spam folder उघडा आणि वरच्या बाजूला more या पर्यायातून " report not spam" निवडा.

7 / 7

Gmail मधील filter तयार करण्यासाठी computer वर Gmail वापरणं आवश्यक आहे. मात्र spam मधून Email बाहेर काढणे आणि sender चा email Contacts मध्ये सेव्ह करणे फोनवरून करता येते. त्यामुळे एखादा महत्त्वाचा Email वारंवार spam मध्ये जात असेल तर तो तसाच दुर्लिक्षित न करता या सेंटिग्स तपासून पाहा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us