IND vs SL : सूर्यकुमारच्या ‘त्या’ एका निर्णयाने सुपर ओव्हर आधीच टीम इंडियाने जिंकलेला सामना, नेमका कोणता?
टीम इंडिया आणि श्रीलंकमध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 ने यंग ब्रिगेडनेा बाजी मारली. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांच्या नव्या भूमिकेचा प्रवास शुभ झाला. या मालिकेतील तिसरा सामना चित्रपटापेक्षा जास्त सस्पेन्सवाला ठरला. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने सामना जिंकला असला तरी सूर्याचा एक निर्णय असा होता तिथेच टीम इंडियाने जवळपास बाजी मारली होती.

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 137-9 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघालाही 20 ओव्हरमध्ये 137-8 धावा करता आल्या.

सामना टाय झाला, शेवटची ओव्हर कॅप्टन सूर्यकुमार यादवने टाकली. ओव्हरमध्ये श्रीलंका संघाने दोन विकेट गमावल्या आणि सामना टायपर्यंत संपला.

सूर्यकुमार यादवआधी रिंकू सिंह याने ओव्हर टाकली. दोघांनीच खऱ्या अर्थाने सामना फिरवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 12 बॉलमध्ये 09 धावांची श्रीलंका संघाला गरज होती.

रिंकू आणि सूर्याने ओव्हर टाकत सामना टाय केला. आता सुपर ओव्हर कोण टाकणार? सूर्यकुमारकडे त्यावेळी दोन पर्याय होते, त्यामध्य मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर. यामध्ये सूर्याने सुमंदरकडे चेंडू सोपवला.

वॉशीने पहिला चेंडू वाईड टाकला, त्यानंतर दोन धावा दिल्या आणि सलग दोन विकेट घेत टीम इंडियासाठी विजय मिळवणं सोपं केलं. सुर्यकुमार आणि गिल ओपनिंगला आले तर सूर्याने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने टीम इंडियाने आपल्या खिशात घातली.