तुमच्या खिशातील 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी बनवण्यासाठी नेमका किती खर्च येतो?

भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नाणी आणि नोटा तयार करण्यासाठी किती खर्च करतात याची माहिती या लेखात आहे. १ रुपयाच्या नाण्यापासून २० रुपयाच्या नाण्यापर्यंत, प्रत्येक नाण्याची निर्मिती किती खर्चिक आहे याचा सविस्तर आकडेवारीचा समावेश आहे.

| Updated on: Jun 04, 2025 | 5:09 PM
1 / 9
भारत सरकारकडून अनेक चलनाची निर्मिती केली जाते. १ रुपयांच्या नाण्यापासून २० रुपयांच्या नाणीही सरकारकडून बनवली जातात.

भारत सरकारकडून अनेक चलनाची निर्मिती केली जाते. १ रुपयांच्या नाण्यापासून २० रुपयांच्या नाणीही सरकारकडून बनवली जातात.

2 / 9

भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे निर्मिती केली जाणाऱ्या चलनासाठी म्हणजेच नाणी आणि नोटांसाठी नेमका किती खर्च येतो, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

3 / 9

सध्या बाजारात १, २, ५, १० आणि २० रुपयाचे नाणे चलनात आहे. पण ही नाणी बनवण्यासाठी कोट्यावधींचा खर्च येतो.

4 / 9

प्रत्येक मूल्याच्या नाण्यासाठी वेगवेगळा खर्च येतो. नाण्याच्या निर्मितीसाठी नाण्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा जास्त खर्च सरकारला करावा लागतो.

5 / 9

एक रुपयाचं नाणं बनवायला १.११ रुपये खर्च करावे लागतात. तर, २ रुपयांच्या नाण्यासाठी १.२८ रुपये खर्च येतो.

6 / 9

५ रुपयांच्या नाण्यासाठी सरकार ३.६९ रुपये खर्च करते. तर, १० रुपयांच्या नाण्यासाठी ५.५४ रुपयांचा खर्च येतो. आरबीआयने २०१८ साली एका अहवालातून ही माहिती सांगितली आहे.

7 / 9

भारतातील चलनाची छपाई आणि व्यवस्थापन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे हाताळले जाते. तर मूल्यांचे नियमन करण्याची जबाबदारी भारत सरकारची असते.

8 / 9

देशातील चार प्रेसमध्ये चलनी नोटांची छपाई केली जाते, त्यापैकी दोन आरबीआयच्या आणि इतर दोन केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत.

9 / 9

RBI चे प्रेस म्हैसूर आणि सालबोनी येथे आहेत, तर सरकारी प्रेस नाशिक आणि देवास येथे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us