पहिल्याच बॉलवर मैदान गाजवलं! अभिषेकच्या गगनभेदी षटकारानं या दोन दिग्गजांना मागे टाकलं, केला ‘हा’ मोठा विक्रम
Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माने न्यूझीलंड दौऱ्यात फलंदाजीला उतरताच सुरुवातीला एक शानदार गगनभेदी शॉट ठोकला. यावर त्याला ६ धावा मिळाल्या आणि यासह त्याने एक मोठा रेकॉर्ड केला.

टीम इंडियाचा शानदार फलंदाज अभिषेक शर्मा हा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. यावेळी त्याने संघासाठी चांगली सुरुवात करुन दिली.
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना आज खेळवला गेला. यावेळी फलंदाजी करायला आल्यावर अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि त्याचे खाते उघडले.
अभिषेकने मॅट हेनरी याच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि त्यासोबत एक जागतिक विक्रम त्याच्या नावावर केलाय.
दरम्यान, अभिषेक शर्मा हा आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी तब्बल ७व्यांदा केली आहे.
अभिषेक शर्मा याने या विक्रमासह अफगाणिस्तानच्या शफिकुल्ला शिनवारी ६ आणि सूर्यकुमार यादव ५ यांना मागे टाकले असून सध्यातरी त्याचा हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता कमीच आहे.