‘ती माझा आरसा…’, पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळेंनी थाटला दुसरा संसार, कोण आहे त्यांची पत्नी?
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे.... ज्यांनी 'सैराट' सारखा सिनेमा मराठी कलाविश्वाला दिला, ज्यामुळे कलाविश्वाला एक वेगळं वळण लागलं. त्यानंतर देखील अनेक सिनेमे नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केले. आता ते 'खाबाशा' सिनेमामुळे चर्चेत आहे. पण नागराज मंजुळे यांना मिळणाऱ्या यशा मागे कोण आहे. याबद्दल फार कोणाला माहिती नसेल...

असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा मोलाचा वाटा असतो... मग ती स्त्री आई, बहीण किंवा बायको असते... नागराज मंजुळे यांच्या आयुष्यात देखील अशी एक महिला आहे, जिचा त्यांच्या यशामागे मोलाचा वाटा आहे... ती स्त्री नागराज मंजुळे यांची पत्नी आहे.

नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, त्याचं पहिलं लग्न फार कमी वयात झालं. पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळे यांनी दुसरं लग्न कलं. त्यांच्या पत्नीचं नाव गार्गी कुलकर्णी आहे.

गार्गी कुलकर्णी या आहिल्यानगर येथीलच आहे. गार्गी आणि नागराज यांची पहिली ओळख देखील आहिल्यानगर येथेच झाली. गार्गी यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.. खुद्द नागराज यांनी सांगितलेलं की, 'गर्गीला वाचनाची आवड आहे आणि कविता देखील करते...'

नागराज मंजुळे जेव्हा पटकथा लिहितात तेव्हा फार कमी लोकांना दाखवतात... फक्त 2 - 3 लोकांना ते पटकथा दाखवतात. त्यामध्ये गार्गीचं नाव देखील आहे. गार्गी यांना भाषा आणि साहित्याची प्रटंच आवड आहे. त्या सिनेमा निर्मात्या देखील आहेत.

एका मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणालेले, 'मी ज्या रतनात्मक गोष्टी करतो, त्यामध्ये गार्गीचा फार मोठा वाटा असतो... ती माझा आरसा आहे..' असं देखील नागराज मंजुळे म्हणालेले. नागराज आणि गार्गी यांनी मिळून 'आटपाट' प्रॉडक्शनची सुरुवात केली... नागराज आणि गार्गी यांचं लग्न 2017 मध्ये झालेलं.