भारतीय रेल्वेची चांदी; भंगार विकून कोट्यवधींची कमाई

Indian Railway | गेल्यावर्षी कोरोनाकाळात भारतीय रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले होते. नव्या वर्षातही रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून घसघशीत उत्पन्न मिळवले आहे.

1/5
गेल्यावर्षी कोरोनाकाळात भारतीय रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले होते. नव्या वर्षातही रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून घसघशीत उत्पन्न मिळवले आहे.

2/5
दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी उत्तर रेल्वेने भंगारच्या विक्रमी विक्रीतून 227.71 कोटी रुपयांची कमाई केली, अशी माहिती उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आशुतोष गांगल यांनी दिली. गेल्या याच कालावधीत मिळवलेल्या 92.49 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा हे 146% जास्त आहे.

3/5
भंगाराची विल्हेवाट लावणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. स्क्रॅप कमाईसह कामाचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. रेल्वे ट्रॅकचे तुकडे, स्लीपर, रेल्वे लाईनजवळील टायबार सारख्या स्क्रॅपमुळे सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाक्या, केबिन, क्वार्टर आणि इतर बेबंद संरचनांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या त्वरित मोडीत काढण्याला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे आणि उच्च स्तरावर त्यांचे निरीक्षण केले जाते.

4/5
रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिनं, त्यांच डब्बे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्याप्रमाणावर भंगार निघते. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलावप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. रेल्वे खात्याने 2021-22 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 4100 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

5/5
गेल्या काही वर्षांत रेल्वे विभागाच्या भंगाराच्या वस्तू अनेक ठिकाणी पडून राहिल्याने समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, अलीकडच्या काळात भंगाराची वेगाने विक्री होत असल्याने अनेक जागाही रिकाम्या होत आहेत. त्यामुळे या जागांचा योग्य वापर होताना दिसत आहे. तसेच रेल्वेला यामधून उत्पन्नही मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI