AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Oberoi : दुबईत आलिशान व्हिला, घरात स्विमिंग पूल अन् ऑरगॅनिक गार्डन! 1200 कोटींची संपत्ती असलेल्या अभिनेत्याच्या घराचे फोटो पाहिले का ?

बॉलिवूड अभिनेता आणि बिझनेसमन विवेक ओबेरॉयचा दुबईतील आलिशान व्हिला चर्चेत आहे. 1200 कोटींचं नेटवर्थ असलेल्या विवेकच्या या घरात आधुनिक लक्झरीसोबतच भारतीय संस्कृतीची झलक दिसते. हिरवेगार गार्डन, स्विमिंग पूल, आकर्षक इंटिरिअर डिझाइन आणि शांतता हे या घराचे मुख्य वैशिष्ट्य आहे, जिथे तो कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवतो.

| Updated on: Oct 17, 2026 | 6:34 PM
Share
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी फक्त फिल्म्समध्येच काम केलेलं नाही, तर बिझनेस जगातही ओळख निर्माण केली आहे.  विवेक ओबेरॉय पण त्यापैकीच एक आहे. अभिनेता आणि बिझनेसमन असलेल्या विवेक ओबेरॉयचं नेटवर्थ 1200 कोटींच्या आसपास आहे. त्याची लग्झरी लाइफस्टाइलही नेहमी चर्चेत असते. दुबईत त्याचा एका आलिशान व्हिला असून.  ज्यात फक्त लग्झरी नाही तर भारतीय संस्कृतीची झलकही पहायला मिळते.  मॉडर्न फर्नीचर, भारतीय कलाकृती आणि जुन्या काळातील डिझाइन - यांचा सुरेख मेळ घरात दिसतो. घरात मोठं गार्डन,  स्विमींग पूल आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण फक्त आलिशान गोष्टी हीच या घराची खासियत नाही तर तेथील निवांतपणा, शांतता देखील हवहवीशी आहे. ( All Photos : Youtube)

1 / 8
विवेक ओबेरॉयचा दुबईमधील व्हिला बाहेरून जितका सुंदर दिसतो, तितकाच तो आतूनही आलिशान आहे. या घरात अनेक गाड्या पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे. मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी सुंदर मार्ग आहेत. त्याच्या आजूबाजूला हिरवळ पाहायला मिळते. घरात प्रवेश करताच सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवलेला लिव्हिंग एरिया दिसतो.

2 / 8
या घराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं इंटिरिअर. येथे मॉडर्न आणि युरोपियन डिझाइनसोबतच भारतीय सजावटीचाही सुंदर समावेश करण्यात आला आहे. घरात वेगवेगळ्या गरजांनुसार बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळ एक आरामदायी सीटिंग एरिया आहे, जिथून गार्डनचं सुंदर दृश्य पाहता येतं. याच्याच जवळ पाहुण्यांसाठी खास ड्रॉइंग रूम तयार करण्यात आली आहे.  घराच्या भिंतींवर आणि विविध कोपऱ्यांमध्ये लावलेल्या कलाकृती घराच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे साध्या आणि हलक्या रंगांच्या इंटिरिअरलाही आकर्षक लुक मिळतो. घराच्या सजावटीत विवेकची पत्नी प्रियंका अल्वा ओबेरॉय यांच्या आवडीची झलकही पाहायला मिळते.

3 / 8
विवेक ओबेरॉयच्या घराच्या सजावटीमध्ये त्याची पत्नी प्रियंकाची महत्त्वाची भूमिका आहे. विवेकने एका मुलाखतीत घराच्या इंटिरिअरविषयी सांगितलं होतं की, घरातील कलाकृती त्याच्या आवडीच्या आहेत, तर इतर सजावटीमध्ये प्रियंकाच्या आवडीचा मोठा वाटा आहे. “हे माझा आर्ट कलेक्शन आहे. यातील सर्व कलाकार देशी आणि भारतीय आहेत. बाकी सगळं प्रियंकाचं आहे. तिला जुन्या काळातील वस्तूंचा वापर करून तयार केलेली आरामदायी आणि घरगुती सजावट आवडते ”, असं तो म्हणाला होता.

4 / 8
या घरात एक सुंदर डायनिंग एरियाही आहे. येथे सुंदर डायनिंग टेबल ठेवण्यात आलं असून, जेवताना मागील बाजूला असलेल्या गार्डनचं दृश्य पाहता येतं. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी ही जागा उत्तम आहे. डायनिंग एरियाजवळ टेलिव्हिजनही आहे.याशिवाय, घरात सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं किचन आहे. त्यामध्ये ब्रेकफास्ट काउंटर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे किचनला मॉडर्न आणि मोकळा लुक मिळतो.

5 / 8
विवेक ओबेरॉयच्या दुबईतील घरात हिरवळीला विशेष महत्त्व आहे. घराच्या आतही अनेक ठिकाणी झाडं लावण्यात आली आहेत. लिव्हिंग एरियापासून ते घराच्या विविध कोपऱ्यांपर्यंत सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते. विवेकला बागकामाची खूप आवड असून, त्याची झलक घराबाहेरील गार्डनमध्येही दिसून येते. 'द कर्ली टेल्स'शी बोलताना विवेक म्हणाला होता, “आम्हाला झाडं खूप आवडतात. मी सतत बागकाम करत असतो.” त्याच्या घराबाहेर एक ऑरगॅनिक गार्डनही आहे. येथे कढीपत्ता, विविध मसाले आणि भाज्या पिकवल्या जातात.

6 / 8
विवेक ओबेरॉयच्या या आलिशान व्हिलाचा मागील भागही अतिशय सुंदर आहे. येथे मोठा स्विमिंग पूल आहे, ज्याच्या बाजूला बसून आराम करता येतो. याशिवाय, पेर्गोलाने झाकलेला आउटडोअर लाउंजही तयार करण्यात आला आहे. सभोवताली असलेल्या हिरवळीमुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि शांततेचे काही क्षण अनुभवण्यासाठी ही जागा उत्तम ठरते. विवेक आणि प्रियंका यांनी या घरासाठी अशी जागा निवडली, जिथून पाण्याचं सुंदर दृश्य दिसतं आणि सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. विवेकने सांगितलं होतं की, प्रियंकाला असं घर हवं होतं, जिथून पाणी दिसेल आणि दररोज सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकता येईल.

7 / 8
विवेक ओबेरॉय गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून दुबईमध्ये राहतोय. व्यवसाय आणि इतर कामांमध्ये व्यस्त असूनही तो आपल्या कौटुंबिक आयुष्याला महत्त्व देतो.  संध्याकाळी साधारण 6:30 वाजेपर्यंत घरी परतण्याचा त्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून त्याला मुलांसोबत वेळ घालवता येईल. घरी परतल्यानंतर मुलांसोबत फुटबॉल खेळणं आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणं त्याला आवडतं. याशिवाय, सकाळच्या शांत वातावरणात गार्डनमध्ये वेळ घालवणं हादेखील त्याच्या दैनंदिन दिनक्रमाचा एक भाग आहे.

8 / 8
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट