लवकरच सर्वात महाभयंकर युद्ध? होर्मुझमध्ये….त्या दिग्गजाच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली!
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. युद्ध थांबवण्यासाठी काय करायला हवे, याबाबत सध्या दोन्ही देशांत बोलणी होत आहे. दरम्यान, एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच प्रसिद्ध गुंतवणूकदार डालियो यांनी सूचक इशारा दिला आहे.

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही देशांत तात्पुरती शस्त्रसंधी झाल्यानंतर आता युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी ही चर्चा केली जात आहे. परंतु एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे हादरवून टाकणारा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ब्रिजवॉटर असोशिएट्सचे संस्थापक रे डालियो यांनी युद्ध तसेच सध्या सुरू असलेल्या चर्चेविषयी गंभीर इशारा दिला आहे. या युद्धातील अंतिम आणि निर्णायक लढाई अजूनही बाकी आहे, असं मत डालियो यांनी व्यक्त कलं आहे.

सध्या सुरू असलेल्या चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी ही केंद्रस्थानी आहे. या चर्चेत अमेरिका व्यापारी जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित न करू शकल्यास युद्धातील अमेरिकाचा हा पराभवच आहे, असे मानले जाईल. जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित न झाल्यास सध्याच्या चर्चेला काहीही अर्थ उरणार नाही, असे डालियो यांनी म्हटले आहे.

इराणने जहाजांच्या सुरक्षित प्रवासास सहमती न दर्शवल्यास त्याचा जागतिक पातळीवर परिणाम पडू शकतो. जागतिक उर्जा बाजाराला फटका बसू शकतो. सहकारी देशांचा अमेरिकेवरील विश्वास कमी होऊ शकतो, जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलरला फटका बसू शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

त्यामुळेच सध्याची चर्चा ही खूपच महत्त्वाची असून होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक व्यपार, जागतिक अर्थव्यवस्था, उर्जेचा पुरवठा यावर परिणाम टाकणारी आहे, असे डालियो म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.