
लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल सीझनमधील 30 व्या सामन्यानंतर, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत फारसे बदल झालेले नाहीत, परंतु सध्या निकोलस पूरन आणि नूर अहमद हे पहिल्या स्थानी आहेत. त्यामुळे आता ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवण्यात चुरशीची लढत सुरू आहे.

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर निकोलस पूरनने आत्तापर्यंत 7 सामन्यांमध्ये 357 धावा केल्या आहेत.

तर, गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला ऑरेंज कॅप मिळवण्याच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येण्याची उत्तम संधी आहे. साई सुदर्शनने 329 धावा केल्या आहेत. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांमध्ये फक्त 28 धावांचा फरक आहे. साई सुदर्शन हा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.

आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, निकोलस पूरन आणि साई सुदर्शन यांच्याव्यतिरिक्त, लखनौ सुपर जायंट्सचे मिशेल मार्श, पंजाब किंग्ज, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांचा समावेश आहे.

आता जर आपण आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंबद्दल बोललो तर पर्पल कॅप मिळवण्याच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्जचा नूर अहमद आहे, ज्याने आतापर्यंत 12 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीतील टॉप-8 गोलंदाजांमध्ये विकेटचे फारसे अंतर नाही.

टॉप 8 मध्ये असे 5 गोलंदाज आहेत. ज्यांच्या खात्यात 10 विकेट आहेत. दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 11 बळी घेतले आहेत. या वर्षीच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत निकोलस पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे, तर नूर अहमद पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.