Praful Hinge: प्रफुल्ल हिंगे याची नेटवर्थ किती? IPL मध्ये विकेटचा धडाका, गोलंदाज होण्याचा कुणाचा सल्ला?
Praful Hinge Networth : सनराईजर्स हैदराबाद संघाचा उमदा खेळाडू प्रफुल्ल हिंगे हा नागपूरकर आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरोधात कमाल खेळी केली. वैभव सूर्यवंशीपासून इतरांचे आव्हान मोडून काढले. या ध्येयवेड्या क्रिकेटपटूला गोलंदाजीचा मौल्यवान सल्ला कुणी दिला? तो हिंगे यांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरला.

Praful Hinge Networth : सनराईजर्स हैदराबाद संघाने डिसेंबर 2025 मधील लिलावात प्रफुल्ल हिंगे याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याने सनराईजर्स संघाचा विश्वास डळमळू दिला नाही. संघ व्यवस्थापनाचा त्याला संघात घेण्याचा निर्णय फायदेशीर ठरला. पदार्पणातच त्याने सरस कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात त्याने खेळाडूंना तंबूत पाठवले.

प्रफुल्ल हिंगे याची संपत्ती किती आहे याची अधिकृत आकडेवारी समोर नाही. अंदाजे त्याची संपत्ती एक ते दोन कोटी असल्याचे सांगण्यात येते. आयपीएलचा पगार आणि घरगुती क्रिकेट मैदानावरील सामन्यांसाठीचे मानधन हेच त्याच्या कमाईचे साधन आहे. अजून त्याची एंडोर्समेंटमधून कमाई झालेली नाही.

प्रफुल्ल हिंगे हा नागपूरकर आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरोधात कमाल खेळी केली. वैभव सूर्यवंशीपासून इतरांचे आव्हान मोडून काढले. त्याने सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन ड्रे प्रिटोरियस यांना बाद केले. त्याने पहिल्याच सामन्यात तीन फलंदाज तंबूत पाठवले. त्याची आयपीएलमधील किंमत वधारली आहे.

प्रफुल्ल हिंगे याचा जन्म 2002 मध्ये नागपूरमध्ये झाला. त्याने 12 वर्षांचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तो फलंदाज होऊ इच्छित होता. पण त्याच्या वडिलांनी त्याला गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. हा सल्ला आज मोलाचा ठरला आहे.

COVID-19 मध्ये त्याला इतरांप्रमाणे संकटांचा सामना करावा लागला. त्याचे प्रशिक्षण थांबले. पण हिंगेने हार मानली नाही. तो तयारी करत राहिला. पुढे त्याला U-23 संघात स्थान मिळाले. हीच त्याच्या व्यावसायिक क्रिकेटर होण्याची पहिली सुरुवात होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

2024 मध्ये प्रफुल्ल हिंगे याने ब्रिस्बेन येथे जोश हेजलवुड आणि झाय रिचर्डसन याच्यासह प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरूण अरोरा याचे मार्गदर्शन त्याला मिळाले. सनराईजर्स हैदराबादपर्यंतच्या त्याच्या प्रवासात अरोरा यांचे सहकार्य होते.