मी मरायला तयार, 14 दशलक्ष लोकांनी… इराणच्या राष्ट्रपतींकडून ओपन चॅलेंज; डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का!

अमरेिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात आता मोठा विद्ध्वंस होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे उर्जा प्रकल्प, पूल तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.

| Updated on: Apr 07, 2026 | 7:32 PM
1 / 5

2 / 5

इराणने आमच्या अटी मान्य न केल्यास आम्ही आतापर्यंतचे सर्वात संहारक असे हल्ले करू, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. त्याआधाची दुसरीकडे इस्त्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. एकट्या इराणला दोन्ही देशांनी घेरल्याने काहीतरी भयंकर घडणार असल्याचे बोलले जात आहे.

3 / 5

या युद्धाचा धसका जगाने घेतल्याचे दिसत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे. या युद्धात मीदेखील माझे प्राण द्यायला तयार आहे, असं पेझेश्कियान म्हणाले आहेत.

4 / 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी मंगळवारपर्यंत खुली करावी, असा प्रस्ताव ठेवला होता. ही मुदत आता संपत आली आहे. असे असतानाच पेझेश्कियान यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

5 / 5

आतापर्यंत अभिमानी 14 दशलक्ष इराणी नागरिकांनी या युद्धात प्राणांची आहुती देण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मीदेखील इराणसाठी माझे प्राण देण्यासाठी तयार होतो आणि भविष्यातरी राहील, असे पेझेश्कियान म्हणाले आहे. हे ट्वीट करून त्यांनी अमेरिकेला एका प्रकारे आव्हानच दिसे आहे. त्यानंतर आता अमेरिका नेमकं काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us