
जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी रिंगणगाव येथील ग्रामस्थांनी एरंडोल राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.

मोठ्या संख्येने महिलांसह पुरुषांनी महामार्गावर ठिय्या मांडून तब्बल एक तास महामार्ग रोखून धरला.

या रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या...

अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थानी आंदोलन मागे घेतले.

तब्बल एक तासानंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.